Home Breaking News धक्कादायक…अंगणवाडी सेविकेचा विनयभंग.!

धक्कादायक…अंगणवाडी सेविकेचा विनयभंग.!

●आरोपीवर अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल...

C1 20260506

आरोपीवर अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल….!

ROKHTHOK | मारेगाव तालुक्यातील खंडणी परिसरात अंगणवाडी सेविकेचा विनयभंग झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. Shocking… molestation of an Anganwadi worker!

प्राप्त माहितीनुसार, 50 वर्षीय अंगणवाडी सेविका भुरकीपोड येथे कार्यरत आहे. दिनांक 25 एप्रिलला सकाळी 8 वाजताच्या सुमारास त्या खंडणी ते भुरकीपोड या रस्त्याने कर्तव्यावर जात असताना आरोपी अब्दुल असिम अब्दुल गफुर शेख (55), रा. मारेगाव याने त्यांना रस्त्यात अडवले.

C1 20260430

आरोपीने फिर्यादीचा हात पकडून जबरदस्तीने बाजूला ओढत नेले व तिच्या अंगावरील साडी व ब्लाउज फाडून विनयभंग केल्याचा आरोप आहे. यावेळी आरोपीने जातीवाचक व अश्लील शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

Img 20250103 Wa0009

घटनेनंतर भीती व बदनामीच्या भीतीमुळे फिर्यादीने तात्काळ तक्रार नोंदवली नव्हती. तसेच आरोपीकडून आपल्या मुलांना अपाय होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. अखेर धैर्य एकवटून त्यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात हजर होऊन जबानी दिल्यानंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला.

या प्रकरणी विनयभंग, अश्लील शिवीगाळ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Previous articleयुवासेना आक्रमक…नाफेडची चना खरेदी तात्काळ सुरू करा, अन्यथा….!
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.