Home क्राईम दणदणीत… प्रतिबंधित तंबाखूची तस्करी

दणदणीत… प्रतिबंधित तंबाखूची तस्करी

● 68 लाखाचा मुद्देमाल जप्त ● LCB ची धडाकेबाज कारवाई

874
C1 20240408 07283857

68 लाखाचा मुद्देमाल जप्त
LCB ची धडाकेबाज कारवाई

Crime News | स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या “टीप” च्या आधारे दारव्हा वरून यवतमाळ कडे येत असलेल्या आयशर वाहनाला ताब्यात घेण्यात आले. यात 52 लाख 37 हजार रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू आढळून आला. वाहन चालकाला ताब्यात घेत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही दणदणीत कारवाई LCB पथकाने शनिवार दिनांक 6 एप्रिलला केली. Prohibited tobacco worth Rs 52 lakh 37 thousand was found.

राज्यात प्रतिबंधीत गुटखा व सुगंधीत तंबाखुवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे चोरट्या मार्गाने मोठया प्रमाणात तस्करी करण्यात येते. यावर आळा बसावा याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जिल्हयात गुटखा, सुगंधीत तंबाखुची वाहतुक विक्री साठवणुक होणार नाही या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले.

C1 20240408 07285650

दारव्हा येथून आयशर वाहन क्रमांक MH-40- AK- 7045 मधून मोठया प्रमाणात प्रतिबंधीत गुटखा व सुगंधीत तंबाखुची तस्करी होणार असल्याची “टीप” स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पथकाने अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासह यवतमाळ दारव्हा रोडवरील घाटात चिद्दरवार कंस्ट्रक्शन समोर सापळा रचला. संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली असता प्रतिबंधित तंबाखूचा साठा आढळून आला.

आयशर वाहन चालक तोरन सुखराम गहाणे (25) रा. वार्ड क्र. 3 मु. उचापुर, पोस्ट काकोडी ता. देवरी जि. गोंदीया याला ताब्यात घेण्यात आले. तर 52 लाख 37 हजार 600 रुपयाचा प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु व 16 लाख रुपये किमतीचे वाहन असा 68 लाख 37 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुश जगताप यांचे मार्गदर्शनात, LCB निरीक्षक आधारसिंग सोनोने, API अमोल मुडे, PSI राम कांडुरे, योगेश डगवार, सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, सतिष फुके सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यांनी केली.
Rokhthok News