Home क्राईम fake call : मी पोलीस अधिकारी बोलतो….!

fake call : मी पोलीस अधिकारी बोलतो….!

● नागरिकांनो सावधान, फसगत होण्याची शक्यता

1637
C1 20240214 13251977
C1 20240404 14205351
नागरिकांनो सावधान, फसगत होण्याची शक्यता

Crime News : सर्वसामान्य नागरिकांना बनावट कॉल (fake call) करून फसवल्या जात असल्याची अनेक उदाहरणे आहेत. आता तर “मी पोलीस अधिकारी बोलतो, तुमच्या मुलास अटक करण्यात आली आहे.” असे धांदात खोटे बोलून फसविणारे रॅकेट सक्रिय झाले आहे. “I speak police officer, your son has been arrested.”

वणी शहरात असा प्रकार घडल्याचे पोलीस प्रशासनाने मान्य केले आहे. याकरिता नागरिकांनी घाबरून न जाता त्यास आपली माहिती देऊ नये, किंवा पैसे मागितल्यास देऊ नये असे आवाहन केले आहे. जनतेत जागरूकता निर्माण करण्यासाठी नागरिकांनी सुद्धा पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे.

अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आलेल्या कॉल ची खातरजमा करणे आवश्यक आहे. बनावट कॉल च्या माध्यमातून आपली माहिती संकलित केल्या जाते. अनेकवेळा सर्वसामान्य नागरिक त्यांच्या भूलथापांना बळी पडतात. तरी नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन यवतमाळ जिल्हा पोलिसांनी केले आहे.
Rokhthok News