Home क्राईम कोलडेपोच्या कार्यालयातुन क्रिकेटची ‘बेटींग’

कोलडेपोच्या कार्यालयातुन क्रिकेटची ‘बेटींग’

● LCB ची कारवाई, आरोपी वाढण्याची शक्यता

1765

● LCB ची कारवाई, आरोपी वाढण्याची शक्यता

रोखठोक | शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे येथील लालपुलीया परिसरात धाडसञ अवलंबण्यात आले. कोल डेपोच्या कार्यालयात क्रिकेटची बेटींग सुरु असतांना दोघांना ताब्यात घेत एक लाख 67 हजार 650 रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई शुक्रवार दि. 7 एप्रीलला राञी 10 वाजता करण्यात आली असुन या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. On Friday, based on the information received by the local crime branch, a raid was launched in Lalpuliya area here.

LCB
LCB ची कारवाई

अफसर खान अनवर खान (36) रा. शास्ञी नगर, रिजवान सय्यद रियाज सय्यद (22) रा. मोमीनपुरा असे ताब्यातील सटोडीयांचे नाव आहे. IPL क्रिकेटचा ज्वर चांगलाच वाढला आहे त्यातच सातत्याने होणारे सामने जुगाऱ्यांसाठी पर्वणी ठरताहेत.

Img 20250103 Wa0009
C1 20250418 20491706

पोलीसां पासुन बचावासाठी नवनविन युक्त्या सटोडीयां कडून अवलंबल्या जात आहे. काही महाभाग जंगलात बसुन आपले मनसुबे पुर्णत्वास नेत आहे. तर काही सटोडीये वेळोवेळी ठिकाणे बदलवून गावातच आपले बस्तान मांडून आहेत.

लालपुलीया परिसर हा कोलडेपोने व्यापलेला आहे. या भागातुन कोळशाच्या दळणवळणाचा व्यवसाय चालतो. त्यामुळे या ठिकाणावरुन जुगार खेळल्या जात असल्याची साधी भनक सुध्दा पोलीस प्रशासनाला येत नाही.

शुक्रवारी राञी सनराईज हैद्राबाद विरूध्द लखनौ सुपर जायंट या दोन संघात सुरु असलेल्या सामन्यावर मोठया प्रमाणात जुगार खेळल्या जात असल्यााची माहिती LCB पथकाला मिळाली.

लालपुलीया परिसरातील आर. के. कोलडेपो कार्यालयात पोलीसांनी धाडसञ अवलंबले असता दोन तरुण बेटींग करीत असल्याचे आढळुन आले. त्याचे जवळुन 17 हजार 500 रुपये रोकड, एक लॅपटॉप, 12 मोबाईल असा एक लाख 67 हजार 650 रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यारत आला.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोड, अप्पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, यांचे आदेशाने व पोलीस निरिक्षक प्रदिप परदेशी यांचे मार्गदर्शनात सपोनि अमोल मुडे, सुनिल खंडागळे, सुधीर पिदुरकर, सुधीर पांडे, रजनिकांत मडावी यांनी केली असुन सदर गुन्ह्याचा तपास सपोनि माधव शिंदे करीत आहे.
वणी :बातमीदार