● पाच लाखाचा मुद्देमाल हस्तगत
● शिरपूर पोलिसांची कारवाई
रोखठोक | अवैद्य व्यावसायिक सैराट झाले की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे शिरपूर पोलिसांनी शिंदोला परिसरातील जंगलात लपूनछपून चालणारा जुगार उध्वस्त करत तीन आरोपींना ताब्यात घेतले. तर पोलिसांची धाड पडताच अन्य आठ आरोपी पसार झाले. गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईत तब्बल साडे पाच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शिंदोला परिसरातील जंगल अवैद्य व्यावसायिकांचे माहेरघर झाले की काय अशी शंका आता निर्माण होत आहे. बेलोरा, कायर, पुनवट आदी ठिकाणी बिनधास्तपणे जंगलात चालणारे अवैद्य कृत्य संपुष्टात आणण्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करताहेत मात्र अवैद्य व्यावसायिक शिरजोर झालेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शनिवार दि. 25 फेब्रुवारीला शिंदोला परिसरातील जंगलात पत्ता जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार सपोनि गजानन करेवाड यांना मिळाली. पोलीस पथकाने वेशांतर करून धाडसत्र अवलंबले. यावेळी तीन जुगाऱ्याना रंगेहात पकडले मात्र अन्य आठ जुगारी पसार होण्यात सफल झाले.
विलास गोंविंद सावे (45) रा. कोलगाव, संदिप देविदास काळे (28) रा. कुरई, धनराज सुर्यभान बलमे (29) रा. शिंदोला असे ताब्यातील जुगाऱ्यांची नावे आहेत तर प्रमोद वासुदेव टोंगे (48) रा. शिंदोला, अनिल खारकर (32) व रा. कोलगाव, बालाजी निब्रड रा. केशवनगर, मुन्ना पाटील रा. शिंदोला व अन्य जुगारी घटनास्थळावरून पसार झाले आहेत. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
कारवाई दरम्यान दुचाकी क्र. MH-34-AQ 5159, MH-29- BU- 9117, MH-29-AG-4463, MH-29-BR-4841, MH- 34. AY-3201, MH-29-AB-2993, MH 34 W-3165, MH29- BW-9781 व रोख रक्कम 12 हजार 490 रुपये असा एकूण 5 लाख 42 हजार 490 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, SDPO यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सपोनि गजानन करेवाड, PSI रामेश्वर कांदुरे व पोलीस कर्मचाऱ्यांनी पार पाडली.
वणी: बातमीदार