Home क्राईम बंद घर चोरटयांच्‍या निशान्‍यावर, रोकड व सोने लंपास

बंद घर चोरटयांच्‍या निशान्‍यावर, रोकड व सोने लंपास

● मारुती टाउनशिप मधील घटना

774
Img 20240613 Wa0015

मारुती टाउनशिप मधील घटना

Wani News : शहरा लगत असलेल्‍या मारुती टाउनशिप मधील बंद असलेल्‍या घराचे कुलूप तोडून चोरटयांनी डाव साधला. पन्‍नास हजार रुपयांची रोकड व सोने चांदीचे दागीने लंपास केल्‍याची घटना शनिवार दिनांक 26 ऑगष्‍टला दुपारी उघडकीस आली. An incident of theft of fifty thousand rupees in cash and gold and silver jewelery took place

शहरातील बंद घरे चोरटयांनी लक्ष केल्‍याचे दिसत आहे. मागील काही दिवसांपासुन चोरीच्‍या घटनेत वाढ झाली आहे. मारुती टाउनशिप मध्‍ये वास्‍तव्‍यास असलेल्‍या मेघा अभय पेटकर हया कामानिमित्‍य 23 ऑग्‍ष्‍टला आपल्‍या परिवारांसह बाहेरगावी गेल्‍या होत्‍या.

चोरटयांनी घर बंद असल्‍याचे हेरले आणि घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील 50 हजार रुपयांची रोकड व 22 हजार रुपयांचे सोने चांदीचे दागीने लंपास केले. शनिवारी दुपारी फिर्यादी मेघा पेटकर ह्या घरी परतल्‍या असता त्‍यांना घरात चोरी झाल्‍याचे निदर्शनांस आले. त्‍यांनी थेट वणी पोलीस स्‍टेशन गाठून रितसर तक्रार दाखल केली.
Rokhthok News

C1 20240529 15445424