Home सामाजिक शिंदोला येथे श्रीमद भागवत व व्‍यसनमुक्‍ती सप्‍ताह

शिंदोला येथे श्रीमद भागवत व व्‍यसनमुक्‍ती सप्‍ताह

500

विविध कार्यक्रमांची रेलचेल
भाविक भक्‍तांची मांदियाळी

रोखठोक | शिंदोला येथे 21 ते 27 डिसेंबर या कालावधीत श्रीमद भागवत व व्‍यसनमुक्‍ती सप्‍ताहाचे आयोजन करण्‍यात आले होते. परिसरातील भाविक भक्‍तांची अलोट गर्दी बघावयांस मिळाली. सकाळ पासुन राञी पर्यंत चालणारे विविध कार्यक्रम उत्‍साह निर्माण करणारे होते. संजय निखाडे माउली परिवार, गुरुदेव सेवा मंडळ यांच्‍या वतीने आयोजीत सप्‍ताहात नामवंत किर्तनकारांनी सहभाग नोंदवला होता.

संजय निखाडे मिञ मंडळ  सातत्‍याने सर्वसमावेशक,  भक्‍तीमय तसेच व्‍यसनमुक्‍तीचे कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. सर्व प्रथम 2016 मध्‍ये सुरु करण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमांची परंपरा अद्याप कायम आहे. 21 ते 27 डिसेंबर या कालावधीत ह.भ.प. रामेश्वर खोडे  महाराज यांच्‍या अवर्णनिय किर्तनाने उपस्थित भारावून गेले होते त्‍यांनी आपले व्‍यसन महाराजांच्‍या झोळीत टाकत व्‍यसनमुक्‍तींचा संकल्‍प केला.

शिंदोला परिसरातील तुकडोजी महाराज स्‍मारक परिसरात श्रीमद भागवत कथा, ज्ञानयज्ञ व व्‍यसनमुक्‍ती सप्‍ताहात ह.भ.प. रामेश्वर खोडे महाराज, ह.भ.प. सत्‍यपाल महाराज,  ह.भ.प. किशोर महाराज ठाकरे,  दोन्‍ही डोळयांनी अंध असलेले बापुराव पिंपळे महाराज यांच्‍या अमोघवाणीने उपस्थितांच्‍या डोळयात अश्रु दाटले, सत्‍यपाल महाराजांचे शिष्‍य नयनपाल महाराज तसेच ह.भ.प. कांचनताई शेळके यांनी उसळलेल्‍या भाविक भक्‍तांचे प्रबोधन केले.

समाजा प्रती आपली बांधीलकी जपत माऊली परिवार व गूरूदेव सेवा मंडळ यांनी दिलदार पठान शेख यांचा आयोजीत कार्यक्रमात गौरव केला. व्यसनमूक्ती व भागवत सप्ताहाच्‍या  माध्यमातून ग्रामस्‍थांनी व्यसनमूक्त व ग्रामस्वच्छता  संकल्‍पना राबवावी व आपल्या गावाला व्यसनमूक्त स्वच्छ ठेऊन संतानी दीलेल्या संदेशाचे काटेकोर पालन करावे. असा संदेश यावेळी शिवसेनेचे उप जिल्‍हा प्रमुख तसेचे आयोजक संजय निखाडे व माऊली परिवार शिंदोला व गूरूदेव सेवा मंडळ यांनी समस्‍त ग्रामस्‍थांना दिला.

वणी: बातमीदार