Home Breaking News त्‍या… घटनेचा राजुर येथे जाहीर निषेध

त्‍या… घटनेचा राजुर येथे जाहीर निषेध

153

भाजपच्या केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांचे पुत्र आशिष मिश्र टेनी ह्याने उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे आपल्‍या वाहनाने शेतकऱ्यांना अमानुषपणे चिरडण्याचे दुष्कृत्य केले. ह्या घटनेच्या विरोधात राजूर येथे महाराष्ट्र बंद चे निमित्ताने भाजप सरकारचा जाहीर निषेध सोमवार दि. 11 ऑक्टोबरला शहीद भगतसिंग चौकात करण्यात आला.

Img 20250422 wa0027

यावेळी जाहीर निषेध आंदोलनात विविध मागण्‍या करण्‍यात आल्‍या त्‍यात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र टेनी ह्यांना ताबडतोब बडतर्फ करावे, झालेल्या घटनेची सखोल  चौकशी निष्पक्षपणे करून संबंधितांवर कारवाई करावी अशा मागण्‍या करण्यात आल्‍यात.

Img 20250103 Wa0009

भाजप सरकार च्या विरोधात करण्यात आलेल्या जाहीर निषेध आंदोलनात डेव्हिड पेरकावार, मो. असलम, कुमार मोहरमपुरी, नंदकिशोर लोहकरे, सरोज मून, धनराज देवतळे, साजिद खान, जयंत कोयरे, राजेंद्र पुडके, श्रावण पाटील, समीर बेग, विनोद बलकी, शिवदास चालखुरे, मारोती आत्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.