Home Breaking News धक्कादायक…वणीत आज पुन्हा 5 तर झरीत 3 कोरोना ‘बाधित’

धक्कादायक…वणीत आज पुन्हा 5 तर झरीत 3 कोरोना ‘बाधित’

IMG 20260522 WA0013

तरी सुद्धा नागरिक बिनधास्त

वणी: नव वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. या आठवड्यात सातत्याने कोरोना बाधित आढळलेले असताना शहरात नागरिक मात्र बिनधास्त वावरताहेत. सोमवार दि. 10 जानेवारीला प्राप्त अहवालात तालुक्यातील 5 कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आढळून आल्याने यंत्रणा हादरली असली तरी नागरिक मात्र बिनधास्त आहेत.

राज्यात कोरोनाचा “ग्राफ” वाढत असतानाच जिल्हा तसेच तालुक्यात कोरोना बाधित निष्पन्न होताहेत. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 75 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 10 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 229 व बाहेर जिल्ह्यातील 19 अशी एकूण 248 झाली आहे.

IMG 20260511 WA0005

नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोरोना बाधित रुग्ण तालुक्यात आढळत असताना महसूल, पालिका व आरोग्य विभाग अद्याप जागे झाल्याचे दिसत नाही किंबहुना प्रतिबंधनात्मक उपाययोजना करताना निदर्शनास आलेले नाहीत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पहिल्या व दुसऱ्या लाटेत जी खबरदारी घेतल्याजात होती तसलं सौजन्य दाखविल्या जात नाही.

Img 20250103 Wa0009

वणी शहरातील गुरू नगर मधील पुरुष, मनीष नगर मधील महिला, भीम नगर येथील पुरुष, तेजापूर येथील पुरुष व मोहूर्ली येथील महिला तर झरी तालुक्यातील 3 कोरोना बाधित निष्पन्न झाले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 73250 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71214 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1788 मृत्यूची नोंद आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या 75 रूग्णांमध्ये 31 महिला व 44 पुरूष असून त्यात वणी तालुक्यातील 5 कोरोना बधितांचा समावेश आहे. तर झरी तालुक्यातील 3 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहेत.
वणी: बातमीदार