Home Breaking News 22 कोटीच्या मालमत्तेवर 17 संचालकांचा ‘वॉच’

22 कोटीच्या मालमत्तेवर 17 संचालकांचा ‘वॉच’

IMG 20260522 WA0013

जय सहकारची प्रचारात आघाडी

रोखठोक | वसंत जिनिंगच्या संचालक मंडळाकरिता होत असलेल्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. जय सहकार पॅनलने प्रचारात आघाडी घेतली आहे. संस्थेची उत्तरोत्तर आर्थिक प्रगती व्हावी यासाठी दि वसंत को ऑपरेटिव्ह शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी लिमिटेडच्या 22 कोटीच्या स्थावर मालमत्तेवर 17 संचालकांचा ‘वॉच’ असणार आहे.

वसंत जिनिंगची स्थापना 58 वर्षापूर्वी झाली, अनेक चढ उतार संस्थेने बघितले. सुरवातीपासूनच बलाढ्य व्यक्तिमत्वांनी संस्थेचे अध्यक्षपद भूषवले आहे. संस्थेचा आर्थिक स्त्रोत वाढवा याकरिता आपापल्यापरीने प्रयत्न करण्यात आले मात्र खरी भरभराट मावळते अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांच्या कार्यकाळात झाली हे मान्य करावंच लागेल.

IMG 20260511 WA0005

वसंत जिनिंगच्या मालकीची 22 कोटीच्यावर स्थावर मालमत्ता आहे. संस्थेच्या वणी, मारेगाव, मुकूटबन, शिंदोला व मार्डी अशा 5 ठिकाणी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी आहेत. तसेच वणी, कायर, शिंदोला, घोंसा, मारेगाव, मार्डी, मुकूटबन या ठिकाणी संस्थेचे कृषी केंद्र कार्यरत आहे. याशिवाय वणी येथे शेतकरी मंदिर सभागृह, वसंत जिनिंग हॉल व लॉन तर मारेगाव येथे मंगल कार्यालय आहेत आणि हाच खरा आर्थिक स्त्रोत आहे.

Img 20250103 Wa0009

वसंत जिनिंगच्या मालमत्तेवर वॉच ठेवण्याची जबाबदारी 17 संचालकांची आहे. मालमत्तेत वाढ व्हावी याकरिता कठोर अंमलबजावणीची गरज असते. चोख मॅनेजमेंट असेल तर संस्थेची मणिपॉवर वाढते हे सूत्र ऍड. काळे यांना चांगले अवगत आहे.

वसंत जिनिंगच्या उत्थानाकरिता जय सहकार पॅनलचे ऍड. देविदास काळे, विजयबाबू चोरडीया, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रशांत गोहोकार, प्रेमकुमार खुराणा, विलास मांडवकर, पवन एकरे, पुंडलिक भोंगळे, संजय पारखी, लुकेश्वर बोबडे, मोहन जोगी, अमोल ठाकरे, सुरेश बरडे, सुनील वरारकर, वंदना भोंगळे, मंदा पाचभाई, नामदेव सुरपाम निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
वणी: बातमीदार