● तालुक्यातील बाबापूर येथील घटना
suicide news wani | विषारी औषधाला जवळ करून शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. आत्महत्येच्या प्रमाणात होणारी वाढ चिंतेचा विषय आहे. तालुक्यातील बाबापूर येथील 40 वर्षीय शेतकरी पुत्राने विषाचा घोट पोटात रिचवला आणि उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार दि. 20 जुलै ला सायंकाळी घडली. Farmers are risking death by approaching poison.

किशोर शामराव येरगुडे (40) असे मृतकाचे नाव आहे. ते बाबापूर येथील निवासी असून त्यांचे आईच्या नावे तेथे शेतजमीन आहे त्यातील उत्पन्नावर त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालायचा. घटनेच्या दिवशी सायंकाळी त्यांनी विषारी औषध प्राशन केले.
ही बाब पारिवारिक मंडळींना कळताच त्यांनी तातडीने उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात हलवले. त्यांची डॉक्टरांनी तपासणी केली व मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात येणार आहे. त्यांनी आत्महत्या का केली हे स्पष्ट होऊ शकले नाही. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलाग व मुलगी असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News