Home Breaking News क्षुल्लक वादातून घडला थरार… कुऱ्हाडीने वार, एक ठार

क्षुल्लक वादातून घडला थरार… कुऱ्हाडीने वार, एक ठार

● मारेगाव तालुक्यातील घटना 

मारेगाव तालुक्यातील घटना 

Maregaon Crime News | मारेगाव तालुक्यातील मार्डी येथे बुधवारी रात्री धक्कादायक घटना घडली. क्षुल्लक वादातून एका तरुणाने कुऱ्हाडीने सपासप वार करत 21 वर्षीय तरुणांवर जीवघेणा हल्ला चढवला. यात त्याचा मृत्यू झाला असून घडलेल्या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. A youth attacked a 21-year-old youth with an ax after a petty dispute.

कैलास बंडू सोयाम (21) रा. मजरा असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा व अन्य एका तरुणाचा क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. वादाचे रूपांतर हमरीतुमरीवर आले आणि चक्क दुसऱ्या तरुणाने कैलासवर कुऱ्हाडीने हल्ला चढवला.

कुऱ्हाडीचा घाव वर्मी लागताच कैलास खाली कोसळला. मुख्य चौकात घडलेली ही घटना थरारक होती. प्रत्यक्षदर्शींनी तातडीने पोलिसांना सूचित केले तर काही नागरिकांनी त्याला उपचारार्थ मारेगाव येथे हलवले. अति रक्तस्त्राव झाल्याने प्रकृती चिंताजनक होती त्याला वणीला रेफर करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले.

Img 20250103 Wa0009

या प्रकरणी पोलीस तपास करत असून नेमकी कोणत्या वादातून हत्या करण्यात आली हे तपासाअंती उलगडणार आहे. तसेच हत्या करणारा कोण हे स्पष्ट होणार आहे. घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि तपासाला सुरुवात केली आहे.
Rokhthok News

Previous articleआणि…त्‍याने मृत्‍यूला कवटाळले
Next articleपुन्‍हा आत्‍महत्‍या… महिलेने घेतला गळफास
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.