Home Breaking News बस स्थानकावरून दुचाकी लंपास

बस स्थानकावरून दुचाकी लंपास

● परिसरात चोरट्यांचा वावर वाढला

C1 20231122 09183256

परिसरात चोरट्यांचा वावर वाढला

Wani News | दुचाकी चोरट्यांची हिम्मत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. गर्दी, रहदारीच्या ठिकाणावरून दुचाकी लंपास केल्याजात आहे. चोरट्याने चक्क बस स्थानकावरून ऍक्टिव्हा मोपेड दुचाकी लंपास केल्याप्रकरणी वणी पोलिसात 20 नोव्हेंबरला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. A case has been registered in Wani police on November 20 in connection with theft of Activa moped two-wheeler.

लगतच्या चिखलगाव येथे वास्तव्यास असलेला शेतकरी सुधिर अरुण निखाडे (33) हा शेतीकाम आटोपून सात नोव्हेंबरला रात्री गावी परत येत असताना त्याला चक्कर येत असल्याचे जाणवले. त्याने बस स्थानकात दुचाकी लावून फलाट नंबर एक वर जाऊन बसला.

सुधीरला चक्कर आली यामुळे तो त्या फलाटावर झोपला. 8 नोव्हेंबरला पहाटे 5 वाजता त्याला जाग आली असता त्याची पांढ-या रंगाची होन्डा कंपनीची ऍक्टिव्हा क्रमांक MH 29 AV-2585 दिसून आली नाही. त्याने शोधाशोध केली मात्र दुचाकी आढळली नाही.

Img 20250103 Wa0009

दुचाकी लंपास करण्यात आल्याचे लक्षात येताच त्याने पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार दाखल केली आहे. दुचाकी चोरीमुळे त्या शेतकऱ्यांचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शहरात दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने वाढत आहे. पोलिसांनी दुचाकी चोरट्यांचा मुसक्या आवळण्याची गरज निर्माण झाली आहे.
Rokhthok News