Home Breaking News गुणवंत विद्यार्थ्यांना ‘अवॉर्ड ऑफ एक्सेलेन्स’

गुणवंत विद्यार्थ्यांना ‘अवॉर्ड ऑफ एक्सेलेन्स’

● सुशगंगा मध्ये पार पडला सोहळा

C1 20240711 19241538

सुशगंगा मध्ये पार पडला सोहळा

Wani News | दिनांक ११ जुलै रोजी स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने सुशगंगा पब्लिक स्कूल, पॉलिनिक कॉलेज व फार्मसी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थांना अवॉर्ड ऑफ एक्सेलेन्स प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. The meritorious students were felicitated by presenting the Award of Excellence.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष प्रदिप बोनगिरवार, विशेष अतिथीस्थानी लो. टि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद खानझोडे तसेच प्रवीण दुबे प्राचार्य सुशगंगा पब्लिक स्कूल, पुष्पा राणी प्राचार्या सुशगंगा पॉलि‌निक व अली सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

IMG 20260511 WA0005

याप्रसंगी दहावीच्या वार्षिक परीक्षेत उज्ज्वल यश संपादित केलेल्या कृष्णा बिजवे, हनिया खान, श्रावणी बोनगिरवार, तसनिम पठाण, अनुप ऐकरे, अदा पटेल तेसेच पॉलिट्निक कॉलेज व फार्मसी कॉलेज मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Img 20250103 Wa0009

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा पांडे, प्रास्ताविक प्रवीण दुबे सर व आभार प्रदर्शन प्रियांका कानकुटला यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Rokhthok News