● रोटरी क्लब वणी यांचाही सहभाग
Wani News | बोटोनी सारख्या ग्रामीण भागातून येऊन कमी वयात स्केटिंग गोल्ड मेडलिस्ट ठरलेली मनस्वीने आज “30 की.मी. स्केटिंग फॉर युवा” बोटोणी ते वणी हे 30 किलोमीटरचे अंतर स्केटिंग करून गाठले आहे. याबद्दल आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या वतीने शहरातील छत्रपती चौकात मनस्वी चे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. Hind Ratna “Manaswi” was warmly welcomed by MNS

मनस्वीने मारेगाव तालुक्यातील बोटोनी येथून सकाळी 8 वाजता स्केटिंग साठी सुरूवात करून यवतमाळ ते वणी महामार्गावरून हे 30 की. मी. चे अंतर अवघ्या दोन तासात पार केले. या स्केटिंग दरम्यान तिचे गावोगावी स्वागत करण्यात आले. 8:30 वाजता मनस्वी ने मारेगाव गाठल्या नंतर तिचे स्वागत करण्यात आले. यानंतर तिने वणीकडे प्रस्थान केले.

मनस्वीने बाल वयातच पराक्रमाचं उंच शिखर गाठलं आहे. तिने आपल्या पराक्रमाने गाव व तालुक्याचं नाव उंचावलं आहे. कुणालाही हेवा वाटावा असं कर्तृत्व तिनं केलं आहे. स्केटिंगमध्ये 104 सुवर्ण पदकं पटकावणारी मनस्वी तरुण पिढीला संदेश देण्याकरिता व त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याकरिता बोटोणी वरून वणी येथे स्केटिंग केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य नेते राजू उंबरकर यांनी हुरहुन्नरी व कर्तबगार मुलामुलींना यशस्वी वाटचालीकरता नेहमीच प्रोत्साहन देत असतात. मनस्वीने कमी वयात यशाचे उत्तुंग शिखर गाठल्याबद्दल तिचे अभिनंदन करतांनाच ती यशाचे नवनवीन शिखर गाठत राहावी, याकरिता राजू उंबरकर यांनी शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देत तिचे स्वागत केले व तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर यापुढें मनस्वीला तिच्या क्षेत्रांत कुठचीही अडचण आल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तिच्या सोबत खंबीरपणे उभी राहणार असल्याची ग्वाही दिली.
मनस्वी ने याआधी बोटोणी ते मारेगाव हे 12 किमी नंतर स्केटिंग करून पार केले होते. आई – वडिलांच्या या मेहनती बद्दल आणि तिला या शिक्षणाचे धडे दिल्या बद्दल प्रशिक्षक प्रशांत मल यांचे सुद्धा मनसेने आभार व्यक्त केले. तर या स्वागत समारंभात रोटरी क्लब ऑफ ब्लँक डायमंड सिटी वणीने सुद्धा सक्रिय सहभाग घेऊन मनस्वीचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
Rokhthok News






