● श्रीरंगी लांजेवार यांचा खळबळजनक आरोप
Wani News | वणी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी विकास धडसे यांनी शिवसेना शहर प्रमुख स्व. ललित लांजेवार यांना ऍट्रोसिटी ऍक्ट च्या गुन्ह्यात अडकवतो अशी धमकी दिली. यामुळेच “ललित” प्रचंड तणावात असल्याने हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक आरोप श्रीरंगी ललीत लांजेवार यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतून केला आहे. “Lalit” was under a lot of stress and suffered a heart attack
काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रात ‘पोलीस स्टेशनचा हवालदार बनला रेती माफिया’ हि बातमी प्रकाशित झाली होती. ती बातमी ललित लांजेवार यांनी समाज माध्यमावरील एक ग्रुप मध्ये फॉरवर्ड केली. उपविभागीय कार्यालयाजवळ पोलीस कर्मचारी विकास धडसे यांनी “तू बातमी का प्रकाशित केली असे म्हणत तू माझं काही करु शकत नाही व तुला एखाद्या ऍट्रोसिटी ऍक्ट च्या गुन्ह्यात अडकवतो अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घडलेली घटना ललित लांजेवार यांनी शिवसेनेचे नेते विनोद मोहितकर व महेश कूचेवार यांना सांगितली तसेच याबाबत 26 जानेवारीला पालकमंत्री संजय राठोड यांचेकडे रीतसर तक्रार केली. परंतु पोलीस कर्मचारी विकास धडसे यांनी दिलेल्या धमकीला ललित ने मनाला लावून घेतले होते. म्हणूनच या तनावामुळे व धास्ती घेतल्यामुळे त्यांना हृदय विकाराचा झटका आला व त्यात त्यांचा मृत्यू झाला, याला विकास धडसे हेच जबाबदार असल्याचा आरोप श्रीरंगी ललीत लांजेवार यांनी तक्रारीतून केला आहे.
Rokhthok News