● उपजिल्हा प्रमुख कोकास तर विधानसभा प्रमुख कातकडे
Wani News : विधानसभा निवडणुकी पासून शिवसेना (उबाठा) पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रखडलेल्या होत्या. जिल्हाप्रमुख पदावर संजय निखाडे यांची वर्णी लागल्यानंतर पदाधिकारी निवडीत त्यांचा वरचष्मा दिसेल असे वाटत होते. मात्र आमदार संजय देरकर व दीपक कोकास यांनी बाजी मारत पदाधिकारी निवडीत जुन्या- नव्या शिवसैनिकांचा समतोल राखला. उपजिल्हा प्रमुखपदी दीपक कोकस तर विधानसभा प्रमुख म्हणून सुनील कातकडे यांची नियुक्ती करण्यात आली. Deepak Kokas as the sub-district chief and Sunil Katkade as the assembly chief
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने यवतमाळ विभागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना भवन येथून प्रसिद्धी पत्रकाद्वारे नियुक्त्यांची माहिती देण्यात आली.

वणी विधानसभा क्षेत्र
सहसंपर्क प्रमुखपदी संतोष माहूरे, विधानसभा प्रमुख सुनील कातकडे, संघटक मधुकर वरटकर, समन्वयक – रवी बोढेकर, उपजिल्हाप्रमुख -दीपक कोकास, शरद ठाकरे, जिल्हा संघटक गणपत लेडांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वणी तालुका व शहर
वणी तालुका प्रमुखपदी- संतोष कुचणकार, तालुका संघटक- संभाशिव मते, तालुका समन्वयक- रविकांत जैस्वाल, तालुका संपर्कप्रमुख – प्रकाश कऱ्हाड, तालुका सचिव – राजू इद्दे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वणी शहरप्रमुखपदी – विनोद दुमणे, शहर संघटक- प्रशांत बलकी, मनीष बत्रा, शहर समन्वयक- अयुब खा पठाण, शहर संपर्कप्रमुख – राजू तुराणकर, शहर सचिव-अजय चन्ने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वणी तालुका व शहर महिला आघाडी
वणी तालुका संघटक- सुरेखा ढंगणे, तालुका समन्वयक – सुनंदा गुहे, तालुका संपर्कप्रमुख- वृषाली खानझोडे, तालुका सचिव- पौर्णिमा राजूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वणी महिला शहरप्रमुख- सविता आवारी, शहर समन्वयक प्रगती घोटेकर, महिला शहर संपर्कप्रमुख- शालिनी सोमलकर, महिला शहर सचिव – सीमा राजू बालोनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
झरी तालुका व शहर
झरी तालुका प्रमुखपदी- सतीष आदेवार, तालुका संघटक- दयाराम गेडाम, तालुका समन्वयक- सीताराम पिंगे, तालुका संपर्कप्रमुख- संदीप विंचू, तालुका सचिव – अशोक पंधरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. झरी शहरप्रमुखपदी-संजय बिजगुणवार, शहर संघटक विलास गुरनूले, शहर समन्वयक गणेश भालेराव, शहर संपर्कप्रमुख – सुलेमान खान अमर खान, शहर सचिव सुनील सोयाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
झरी तालुका व शहर महिला आघाडी
झरी तालुका संघटकपदी- सुरेखा भोयर, तालुका समन्वयक शारदा चिन्तकुंतलावार, तालुका संपर्कप्रमुख -ममता पारखी, तालुका सचिव रेशमा शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. झरी शहरप्रमुखपदी मीनाक्षी मेंढे, शहर समन्वयक गंगामनी मंचलवार, महिला शहर संपर्कप्रमुख – माधुरी जीवतोडे, महिला शहर सचिव तृप्ती सोयाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मारेगाव तालुका व शहर
मारेगाव तालुका प्रमुख पदी – पुरुषोत्तम बुटे, तालुका संघटक – राजू मोरे, समन्वयक – अतुल वटे, संपर्कप्रमुख -सचिन पचारे, सचिव दिवाकर सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मारेगाव शहरप्रमुख- अभय चौधरी, शहर संघटक-विजय खामणकर, समन्वयक- प्रवीण बोबडे, संपर्कप्रमुख बदरुद्दीन काजी, सचिव-हरिभाऊ बरटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मारेगाव तालुका व शहर महिला आघाडी
मारेगाव तालुका संघटक- इंदुताई किन्हेकर, तालुका समन्वयक मनिषा टोंगे, तालुका संपर्कप्रमुख वनिता काळे, तालुका सचिव राधा गोवारदिपे. मारेगाव शहर महिला पदाधिकारी महिला शहरप्रमुख-वर्षा किंगरे, शहर समन्वयक माला बदकी, संपर्कप्रमुख जिजाबाई वरारकर, महिला शहर सचिव माधुरी नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्त्यांमुळे स्थानिक पातळीवर पक्ष संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास शिवसेनेच्या वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.
Rokhthok News






