Home Breaking News भीषण धडक, दुचाकीस्वार ठार

भीषण धडक, दुचाकीस्वार ठार

● वणी-वरोरा मार्गावरील घटना

C1 20260116

वणी-वरोरा मार्गावरील घटना

Sad News : वणी–वरोरा मार्गावरील महालक्ष्मी मॅरेज हॉलजवळ गुरुवारी रात्री 9 वाजताच्या दरम्यान भरधाव ट्रक ने दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. Bike rider dies on the spot in horrific accident

संतकुमार गोवर्धन जंघेल (29) असे मृतक दुचाकीस्वाराचे नाव आहे. तो मांजरी येथील एका कंपनीत लोडर ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. कामानिमित्त वणी येथे आला होता. काम आटोपून गावी परतत असताना महालक्ष्मी मॅरेज हॉल जवळ मागून भरधाव येत असलेल्या कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रक क्रमांक MH- 40 -CT -4058 ने दुचाकीला जबर धडक दिली. या घटनेत तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली, घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ट्रक ताब्यात घेण्यात आला असून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Rokhthok

Img 20250103 Wa0009