
● नायगाव शिवारात मध्यरात्रीची घटना
● आत्महत्या की अपघात याबाबत संभ्रम
Sad News : नायगाव शिवारातील रेल्वे मार्गावर शुक्रवारी मध्यरात्री सुमारे 12:30 वाजताच्या सुमारास रेल्वेच्या धडकेत एका अज्ञात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. Breaking | Youth killed in train collision
मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव शिवारातील रेल्वे मार्गावरून रेल्वे जात असताना एका तरुणाला धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अपघाताने घडली की संबंधित तरुणाने आत्महत्या केली, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस व वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे.
दरम्यान, मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसून तो कोणाच्या ओळखीचा असल्यास किंवा त्याबाबत काही माहिती असल्यास पोलिसांना कळविण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
Rokhthok






