Home Breaking News बंडू चांदेकर यांची भाजपमध्ये ‘घरवापसी’

बंडू चांदेकर यांची भाजपमध्ये ‘घरवापसी’

● प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत प्रवेश

C1 20260311
IMG 20260522 WA0013

 प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत प्रवेश

Rokhthok |
वणी तालुक्यातील आदिवासी समाजाचे तडफदार नेतृत्व म्हणून ओळख असलेले बंडू चांदेकर यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात घरवापसी केली. बुधवार दिनांक 11 मार्चला मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात अधिकृत प्रवेश केला. Bandu Chandekar’s ‘homecoming’ to BJP

या प्रसंगी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके (Ashok Uike), वणी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार (Sanjeevreddy Bodakurwar), जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल चव्हाण, सुरेश नाखले, मुन्ना बोलेनवार, सूरज गुप्ता आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

IMG 20260511 WA0005

बंडू चांदेकर हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असून त्यांनी शिवसेनेचे वणी शहरप्रमुख म्हणून काम केले आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळे त्यांनी काही वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या माध्यमातून ते जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही निवडून आले होते.

Img 20250103 Wa0009

भाजपात असताना आदिवासी समाजातील प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. दरम्यान, काही काळानंतर शिवसेनेतील पूर्वीच्या सहकाऱ्यांच्या आग्रहास्तव त्यांनी भाजपला रामराम करत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. मात्र तेथे अपेक्षित कार्य करण्यास वाव मिळत नसल्याने त्यांनी पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, वणी विधानसभेचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार (Sanjeevreddy Bodakurwar) यांनी तालुक्यातील तथा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर दिला असून चांदेकर यांच्या पुनरागमनामुळे भाजपला बळ तर मिळणारच आहे शिवाय शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना, पक्षाचे ध्येयधोरण पोहचवता येणार आहे.
वणी : बातमीदार

Previous articleहा काय प्रकार…मुलगाच अश्लीलतेकडे वळला ..!
Next articleBreaking | रेल्वेच्या धडकेत तरुण ठार
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.