● आठ दिवसांपासून चना (हरभरा) खरेदी बंद
ROKHTHOK | नाफेडमार्फत चना (हरभरा) खरेदी मागील आठ दिवसांपासून बंद असल्याने स्थानिक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. व्यापाऱ्यांकडून लुट होत असल्याचा आरोप करत शिवसेनेने प्रशासनाला निवेदन देत नाफेडची चना खरेदी तात्काळ सुरू करावी, अन्यथा…. आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. Youth Sena is aggressive…Start purchasing Nafed gram immediately, otherwise….!
निवेदनात नमूद केल्यानुसार, आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या परिस्थितीमुळे मोठा फटका बसत आहे. खरेदी बंद असल्याचा फायदा घेत काही व्यापारी कमी दराने माल खरेदी करत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे नाफेडची चना खरेदी तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

तसेच प्रायव्हेट कॉटन मार्केटमध्ये तूर, चना व इतर पिकांसाठी हर्रास पद्धत सुरू करावी, काही व्यापाऱ्यांच्या काट्यात फरक असल्याने त्यांची तपासणी करावी, शेतकऱ्यांकडून घेतली जाणारी अडत बंद करावी आणि नाफेड मार्केटमध्ये 50 किलोच्या पोत्यामागे घेतली जाणारी 700 ग्रॅम कटती तात्काळ थांबवावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
या सर्व प्रकारांवर प्रशासनाने तातडीने कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा शिवसेना तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी शिवसेनेचे नेते विजयबाबू चोरडिया, सुधाकर गोरे, शुभम गोरे, राहुल पारखी सह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.






