Home Breaking News बापरे..महिलेच्या गळ्यावर सपासप वार.!

बापरे..महिलेच्या गळ्यावर सपासप वार.!

● विभक्त राहणाऱ्या पत्नीचा गळा चिरला

C1 20260518

विभक्त राहणाऱ्या पत्नीचा गळा चिरला

SAD NEWS | पांढरकवडा तालुक्यातील गोपालपूर (कोलाम पोड) येथे 51 वर्षीय महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. Oh my God….. a sharp blow to the woman’s neck!

मृत महिलेचे नाव कमलाबाई हुसेन मेश्राम (51) असे आहे. त्या पतीपासून वेगळ्या राहत होत्या. पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. पत्नीवर संशय घेत असल्याने घरात वारंवार भांडणे होत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

IMG 20260511 WA0005

सोमवारी सकाळी गावातील एका घराच्या अंगणात कमलाबाई यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने सपासप गंभीर वार करण्यात आल्याचे दिसून आले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Img 20250103 Wa0009

ही घटना मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. माहिती मिळताच पांढरकवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

या प्रकरणी पती हुसेन गड्डू मेश्राम (58) यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. संशय किती भयानक असतो हे या कृत्यावरून उजागर होणार असले तरी हत्या हा पर्याय नसल्याचे मत व्यक्त होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी कौटुंबिक वाद, संशय आणि इतर कारणांच्या अनुषंगाने सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे.

Previous articleत्या…मस्तवाल अधिकाऱ्यांना पाठबळ कुणाचे..!
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.