Home Breaking News Breaking…आशिष खुळसंगे यांचे पद बरखास्त..!

Breaking…आशिष खुळसंगे यांचे पद बरखास्त..!

● प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा निर्णय ● झरी-जामणी ब्लॉक अध्यक्षपदी संदिप बुर्रेवार

C1 20250904 17070532

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा निर्णय
झरी-जामणी ब्लॉक अध्यक्षपदी संदिप बुर्रेवार

Political News : काँग्रेसचे स्थानिक नेते माजी आमदार वामनराव कासावार कधी काय रणनीती अखेल हे चांगल्या चांगल्याना कळत नाही. झरी-जामणी ब्लॉक अध्यक्षपदी असलेले वसंत जिनिंग चे अध्यक्ष आशिष खुळसंगे यांची उचलबांगडी करून संदिप बुर्रेवार यांची वर्णी लावण्यात आली. गुरुवारी काँग्रेस प्रदेश कार्यालय, टिळक भवन (मुंबई) येथे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. Breaking… Ashish Khulsange’s post has been dismissed..!

Img 20250904 wa0012
संदीप बुरेवार, नवे ब्लॉक अध्यक्ष

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निवड समितीने यवतमाळ जिल्ह्यातील झरी-जामणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्षपदी संदिप उर्फ लक्ष्मण भाऊराव बुर्रेवार यांची निवड जाहीर केली आहे. तत्पूर्वी वसंत जिनिंग चे विद्यमान अध्यक्ष आशिष खुळसंगे यांच्याकडे ही जबाबदारी होती. खुळसंगे यांच्या उचलबांगडी मुळे आता त्यांच्या वसंत जिनिंगच्या अध्यक्षपदाबाबत सुध्दा संभ्रम निर्माण झाला आहे.

प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ऍड. गणेश पाटील यांनी 4 सप्टेंबर रोजी अधिकृत पत्र जारी करून या नियुक्तीची माहिती दिली. बुर्रेवार यांना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पंधरा दिवसांच्या आत कार्यकारिणी तयार करून जिल्हाध्यक्षांकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याची प्रत प्रदेश कार्यालयाकडे पाठविणे बंधनकारक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Img 20250103 Wa0009

काँग्रेस पक्षाच्या झरी-जामणी ब्लॉकमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, अशी अपेक्षा पक्षाने व्यक्त केली आहे. बुर्रेवार यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून स्थानिक स्तरावर काँग्रेसचा पाया अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मात्र मावळते ब्लॉक अध्यक्ष खुळसंगे यांच्याकडे नवी जबाबदारी सोपविण्यात येईल की पूर्णतः गच्छंती होईल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
ROKHTHOK