Home Breaking News मनसेचे फाल्गुन गोहोकार यांना मातृशोक

मनसेचे फाल्गुन गोहोकार यांना मातृशोक

● हृदयविकाराने निधन, सायंकाळी 7 वाजता पूरड येथे अंत्यसंस्कार

C1 20250719 18103099

हृदयविकाराने निधन, सायंकाळी 7 वाजता पूरड येथे अंत्यसंस्कार

Sad News :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या मातोश्री वंदना शामराव गोहोकार (65) यांचे आज, शुक्रवार दिनांक 19 जुलैला दुपारी 3:30 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. Falgun Gohokar’s mother dies of heart attack, funeral at Purad in the evening

शेतात काम करत असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न होत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने गोहोकार कुटुंबियांवर शोककळा पसरली असून मनसे कार्यकर्ते तसेच वणी तालुक्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वंदना गोहोकार यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 7 वाजता त्यांच्या मूळगावी पूरड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

IMG 20260511 WA0005

त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार असून मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्यावर मातृछत्र हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते अंत्यदर्शनासाठी पूरड येथे दाखल होत आहेत.
        ( रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)

Img 20250103 Wa0009