Home Breaking News अरेच्‍या… नविनतम रस्‍त्‍याचा उडाला “बोजवारा”

अरेच्‍या… नविनतम रस्‍त्‍याचा उडाला “बोजवारा”

● रस्‍ता बांधकामाची गुणवत्‍ता तपासा ● संजय निखाडे यांचा अल्‍टीमेटम

रस्‍ता बांधकामाची गुणवत्‍ता तपासा
संजय निखाडे यांचा अल्‍टीमेटम

c1_20230927_10514552

Wani News | चारगांव, शिंदोला ते कळमना हा कोट्यवधी रुपये खर्चकरुन निर्माण केलेल्‍या रस्‍त्‍यावर खड्डे पडले आहेत. रस्‍ता अवजड वाहनांच्‍या क्षमतेन्‍वये बांधण्‍यात आलेला नसल्‍याने पुरता बोजवारा उडाला आहे. त्‍या रस्‍ता बांधकामाची तात्‍काळ गुणवत्‍ता तपासणी करावी व संबधीत अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना (ठाकरे गट) उप जिल्‍हा प्रमुख संजय निखाडे यांनी निवेदनातून केली आहे.
The road from Chargaon, Shindola to Kalamana, built at the expense of crores of rupees, has potholes.

c1_20230927_10284237

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी झोपेचे सोंग घेवून वावरत असल्‍याचे वास्‍तव नाकारता येत नाही. अवघ्‍या काही महिन्‍यांपुर्वी नव्‍यानेच बांधण्‍यात आलेला रस्‍ता पुर्णतः उखडला आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामार्गावरुन मोठया प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ असते. कोळसा, सिमेंट व गौण खनिजांचे अवजड वाहने या मार्गावरुन धावत असल्‍याने नविन बांधण्‍यात आलेला रस्‍ता क्षतीग्रस्‍त झाल्‍याचा आव अधिकारी आणताहेत.

IMG 20260511 WA0005

c1_20230927_10455202

महत्प्रयासाने चारगांव ते शिंदोला या मार्गाचे बांधकाम करण्‍यात आले आहे. कंञाटदारांच्‍या अंतर्गत वादामुळे न्‍यायालयीन प्रक्रियेत रस्‍त्‍याचे बांधकाम अडकले होते. यामुळे परिसरातील स्‍थानिक नागरीकांना अतोनात ञास सहन करावा लागला होता. न्यायालयीन निर्णयानंतर रस्‍त्‍याचे बांधकाम करण्‍यात आले माञ अवजड वाहनांच्‍या वहन क्षमतेनुसार बांधकाम करण्‍यात आले नाही असा आरोप संजय निखाडे यांनी केला आहे.

Img 20250103 Wa0009

चारगांव ते शिंदोला यामार्गावरुन खनिजांची अवजड वाहनांतुन होणारी वाहतुक मोठया प्रमाणात आहे. अवजड वाहनाचे चालक मधील दोन्‍ही चाके वर उचलुन मार्गक्रमण करत असल्‍याने ती वाहने प्रादेशीक परिवहन विभागाच्‍या मतानुसार ओव्‍हरलोड समजल्‍या जात असतांना कारवाई माञ होतांना दिसत नाही. यामुळेच रस्‍त्‍याला बाधा निर्माण होत असल्‍याचे सकृतदर्शनी दिसत आहे.

IMG-20230926-WA0032

नव्यानेच बांधण्यात आलेल्या रस्त्याच्या बांधकामाची गुणवत्ता नियंत्रण विभागकडून चौकशी करण्यात यावी, रस्त्याचे निकृष्ट बांधकाम करणारे कंत्राटदार, त्यावर नियंत्रण ठेवणारे संबधीत विभागाचे अभियंता,  रस्‍ता बांधकामाचे देयक काढणारे अधिकारी यांचेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातुन करण्‍यात आली आहे. याप्रसंगी दीपक कोकास, सुधीर थेरे, किशोर किनाके, प्रशांत बालकी, अजय चन्ने, मोंटू अदवाणी, स्वप्नील ताजने यांची उपस्थिती होती.
Rokhthok News

Previous articleकेशवस्मृती मुख्यालयाचा लोकार्पण सोहळा
Next articleआता… दुकानांवर झळकणार मराठी पाट्या
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.