Home Breaking News विहिरीत उडी मारून तरुणांची आत्महत्या

विहिरीत उडी मारून तरुणांची आत्महत्या

● मानसिक तणावातून उचलले पाऊल.!

C1 20260405

मानसिक तणावातून उचलले पाऊल.!

Sad News | तालुक्यातील बोर्डा गावात एका 33 वर्षीय तरुणाने मध्यरात्री विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. राजेंद्र विलास दुर्गे (33) असे मृतकाचे नाव आहे. तो बोर्डा येथील निवासी होता. Youth commits suicide by jumping into well

प्राप्त माहितीनुसार, राजेंद्र दुर्गे यांचे मानसिक संतुलन बिघडले होते व ते काही दिवसांपासून तणावाखाली होते, असे बोलल्या जाते. घटनेच्या दिवशी रात्री त्यांना झोप येत नसल्याचे त्यांनी घरच्यांना सांगितले. त्यानंतर घरातील सर्वजण झोपल्यानंतर राजेंद्र यांनी घराचा दरवाजा बाहेरून बंद करून घराबाहेर पळ काढला. ही बाब लक्षात येताच घरच्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडून राजेंद्र यांचा शोध घेतला.

IMG 20260511 WA0005

दरम्यान, गावाबाहेरील एका विहिरीजवळ त्यांचा मोबाईल आढळून आला. संशय आल्याने विहिरीत पाहणी केली असता त्यांनी उडी घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. उत्तरीय तपासणीसाठी शव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.
Rokhthok

Img 20250103 Wa0009