Home क्राईम आजीला यमसदनी पाठवले, आरोपीला जन्मठेप

आजीला यमसदनी पाठवले, आरोपीला जन्मठेप

● थरकाप उडवणाऱ्या घटनेने समाजमन हादरले होते.....

C1 20250711 21291622

थरकाप उडवणाऱ्या घटनेने समाजमन हादरले होते…..

Crime News : बकऱ्या चारायला जा असे आजीने नातवाला म्हटले. नातवाचा राग अनावर झाला, त्याने चक्क आजीचा कुऱ्हाडीने खुनच केला. ही घटना 10 डिसेंबर 2019 ला राळेगाव तालुक्यातील अंतरगाव येथे घडली होती. या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिन्यांची अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. The accused was sentenced to life imprisonment and a fine of Rs 10,000, with an additional imprisonment of 6 months in default of payment of the fine.

नितीन मोरेश्वर राऊत (21) राहणार अंतरगाव तालुका राळेगाव असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने आजी शकुंतलाबाई मारोती राऊत (70) हिच्यावर कु-हाडीने वार करून तिचा निर्घृण खून केला होता. याप्रकरणी तत्कालीन PSI दिलीप गोपीचंद पोटभरे यांनी गुन्हा नोंदवून तपास केला होता. तपासाअंती आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

या प्रकरणात न्यायालयात एकूण 9 साक्षीदार तपासले. सरकारी वकील मंगेश एस. गंगलवार यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे आरोपीचा दोष सिद्ध झाला. गुन्ह्यात पैरवी अधिकारी योगेश हरीदास वाघमोडे यांनीही अभियोग पक्षाला सक्रिय सहकार्य केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. यु. बघेले यांनी हा निकाल 11 जुलै 2025 रोजी दिला. या खटल्यामुळे राळेगाव परिसरात एकच खळबळ उडाली होती. शेवटी नातवाने आजीचा जीव घेतल्याच्या या दुर्दैवी घटनेला न्याय मिळाला आहे.
ROKHTHOK NEWS

Img 20250103 Wa0009