● 21 लाखाचा मुद्देमाल जप्त, LCB पथकाची कारवाई…
Crime News : मारेगाव शहरात दिनांक 7 एप्रिलला घरफोडी झाली होती. सोन्याचांदीचे दागिने चोरट्याने लंपास केले होते. दाखल गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक बाबीचा अवलंब करत घरफोडीचा छडा लावला. मारेगाव येथील घरफोडीचा ऐवज उमरखेड मधील सराफा कडून ताब्यात घेत पुसद येथील आरोपीला ताब्यात घेण्यात आले. House burglary in Maregaon, jewelry sold in Umarkheed, mastermind arrested..!
दत्ता सटवाजी कुरकुटे राहणार नागेशवाडी, पुसद या मास्टरमाइंड आरोपीला ताब्यात घेण्यात आले. दोन विधी संघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने मारेगाव येथील सुशिल जगेंवार राहणार मारेगाव यांच्या घरी घरफोडी करून सोने चांदी व रोकड असा लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आला होता.
घरफोडी बाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेत विचारणा करण्यात आली. चोरीची कबुली देत नथ्थू कुरकुटे व दत्ता कुरकुटे राहणार नागेशवाडी, ता. पुसद यांच्या मार्फत दागिने विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार पुसद येथे जाऊन पोलिसांनी सापळा रचत आरोपी दत्ता सटवाजी कुरकुटे यास ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान चोरीस गेलेले विविध प्रकारचे सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 21 लाख 37 हजार 771 रुपयांचा शत प्रतिशत मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पुढील कारवाईसाठी आरोपीला मारेगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, यवतमाळ पुसद उपविभागिय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे, PI सतिश चवरे स्था.गु.शा, यांचे मार्गदर्शनात API दत्ता पेंडकर, API धिरज बांडे, PSI धनराज हाके, शरद लोहकर, मुन्ना आडे, सतोष भोरगे, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, निलेश निमकर, सुधिर पिदुरकर, तेजाब रनखांब, सुभाष जाधव, कुनाल मुडेकार, रमेश राठोड, सलमान शेख, रजनिकांत मडावी, सुनिल पंडागळे, राजेश जाधव, रविंद्र श्रिरामे, सतिश फुके सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
ROKHTHOK






