Home Breaking News सिलेंडरचा काळाबाजार : पोलिसांची दणदणीत कारवाई

सिलेंडरचा काळाबाजार : पोलिसांची दणदणीत कारवाई

● 4.30 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

C1 20260423

4.30 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

BIG NEWS : जीवनावश्यक वस्तूंच्या नियमांचे उल्लंघन करत रस्त्यावरच गॅस सिलेंडरचे अनधिकृत नियमबाह्य वाटप करणाऱ्यांविरुद्ध मारेगाव पोलिसांनी दणदणीत कारवाई करत तब्बल 4 लाख 30 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Black market in cylinders: Police take strong action

महेश हरीदास कावाडे (32) वाहन चालक रा. नवरगांव ता. मारेगाव व धम्मपाल चोखाजी दारुडे (49), HP गॅस एजन्सी ग्रामीण वितरक धामणी रोड मारेगांव यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3 व 7 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एचपी गॅस एजन्सीचे बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH 29 BE 2737 रस्त्याच्या कडेला उभे करून, वाहन चालक लोकांना थेट गॅस सिलेंडरचे वाटप करत असल्याचे निदर्शनास आले.

प्राप्त माहितीनुसार, नायब तहसीलदार तथा प्रभारी पुरवठा निरीक्षक अधिकारी विजय दिगांबर मत्ते (56) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे 12.15 वाजताच्या सुमारास करणवाडी ते कुंभा रोडवर, वणी-करंजी महामार्गापासून सुमारे 100 मीटर अंतरावर ही घटना उघडकीस आली.

Img 20250103 Wa0009

कारवाईदरम्यान वाहनातील 20 रिकामे सिलेंडर किंमत 30 हजार 740 रुपये, 20 भरलेले सिलेंडर किंमत 50 हजार रुपये तसेच बोलेरो पिकअप वाहन किंमत 3 लाख 50 हजार रुपये असा एकूण 4 लाख 30 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शाम वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलीस करीत आहेत.
ROKHTHOK

Previous articleघरफोडी मरेगावात, दागिने विकले उमरखेडात, मास्टरमाइंड पुसदचा..!
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.