Home Breaking News धक्कादायक …गळफास लावून संपवले जीवन

धक्कादायक …गळफास लावून संपवले जीवन

● आत्महत्येमागील नेमके कारण अस्पष्ट

C1 20260421

आत्महत्येमागील नेमके कारण अस्पष्ट

Sad News : मारेगाव तालुक्यातील पार्डी येथे एका अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास लावून जीवन संपवले. ही हृदयद्रावक घटना मंगळवार दिनांक 21 एप्रिल ला सकाळी साडे दहा वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे. Shocking…Ended life by hanging

कैलाश चंद्रभान गाडगे (55) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. ते पार्डी येथील निवासी असून त्यांचेकडे अडीच एकर शेती जमीन होती. त्यावरच ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. घटनेच्या दिवशी सकाळी शेतात जातो असे त्यांनी घरच्या मंडळींना सांगितले होते.

IMG 20260511 WA0005

बराच वेळ उलटूनही ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शेतात जाऊन शोध घेतला. यावेळी ते लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. समोरचे दृश्य बघताच घरच्यांनी हंबरडा फोडला. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. मृतक कैलास यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करताहेत. त्याने टोकाचे पाऊल का उचलले हे स्पष्ट होऊ शकले नाही.
Rokhthok

Img 20250103 Wa0009