Home क्राईम LCB ACTION : उच्चभ्रू ड्रग्ज पेडलर तरुण अटकेत

LCB ACTION : उच्चभ्रू ड्रग्ज पेडलर तरुण अटकेत

●अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त

C1 20260419

अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त

Crime News : शहरात MD (मेफेड्रोन) या घातक सिंथेटिक ड्रग्जची विक्री प्रचंड वाढली आहे. उच्चभ्रू तरुण ड्रग्ज तस्करीच्या विळख्यात अडकले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या(LCB) पथकाने धडक कारवाई करत शनिवारी दुपारी येथील देशमुखवाडी परिसरातून दोन तरुणाला ताब्यात घेत अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केला. LCB ACTION: High-ranking drug peddler youth arrested

राहुल दिलीप ठाकुरवार (40) व प्रीतम लिलाराम केशवाणी (44) अशी अटकेतील MD ड्रग्ज पेडलर ची नावे आहेत. शनिवार दिनांक 18 एप्रिलला प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या(LCB) पथकाने देशमुख वाडी परिसरात बसस्थानकाच्या मागील रस्त्यावर सापळा रचला. यावेळी काळ्या रंगाच्या विनाक्रमांक मोपेडवर आलेल्या संशयितांना थांबवून चौकशी केली असता त्यांच्याजवळ MD ड्रग्ज आढळून आले.

IMG 20260511 WA0005

अंमली पदार्थ विक्रीविरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी आपल्या अधिनस्त सर्व यंत्रणांना कठोर निर्देश दिले आहेत. LCB ने आपल्या गोपनीय सुत्रदारांना सतर्क केले आहे. MD ड्रग्ज बाबतच्या जिल्ह्यातील बहुतांश कारवाया गुन्हे शाखेच्या(LCB) पथकाने केल्या आहेत. येथे करण्यात आलेल्या कारवाईत उच्चभ्रू तरुणांचा सहभाग आढळून आला मात्र घातक MD ड्रग्ज ते कोणाला देणार होते हे आजपर्यंतच्या कोणत्याही कारवाईतून उघड झाले नाही.

Img 20250103 Wa0009

सदर कारवाईत 21.18 मिलीग्रॅम MD ड्रग्ज, नगदी रक्कम, मोबाईल व दुचाकी असा एकूण दोन लाख 30 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे, वणीचे पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर, API दत्ता पेंडकर, PSI धनराज हाके, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदूरकर, निलेश निमकर, सलमान शेख,रजनीकांत मडावी, सतीश फुके यांनी केली.
Rokhthok