● वणी पोलिसांची धडक कारवाई
Crime News :
कुंभारखनी वसाहत परिसरात सुरू असलेल्या अवैध कोंबड बाजारावर वणी पोलिसांनी धाडसी कारवाई करत सहा जुगाऱ्याना अटक केली. या कारवाईत एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई रविवारी करण्यात आली. Raid on “komabad bazar”, 6 people arrested
उपविभागीय पोलीस अधिकारी, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या आदेशाने ही कारवाई पार पडली. पोलीस हवालदार निलकमल भोसले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, कुंभारखनी वसाहत च्या मागील जंगलसदृश भागात काही इसम कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांची बाजी लावून जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले.

प्राप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक सुयोग महापुरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पंचांसह घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांना पाहताच काही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून सहा आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून रोख रक्कम, मोबाईल फोन, कोंबडे, दुचाकी व इतर साहित्य असा एकूण 1 लाख 4 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कैलास जगन पेंदोर (30), धर्मा किसन परचाके (43) हे हे दोघे झरी-जामनी तालुक्यातील सुरला येथील निवासी आहेत तर उत्तम बोडकाजी ठाकरे (55) रा. वेगाव, ता. मारेगाव, ऋषभ गजानन खुसपुरे (28) रा. कोलगाव, ता. मारेगाव, शंकर शामराव वराटे (32) रा. मारेगाव, ता. वणी, रमेश हिरामन झाडे (40) रा. गणेशपूर, ता. वणी असे अटकेतील जुगाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्या जवळून 40 हजार 600 रुपये रोख, झुंजीसाठी वापरलेले 3 कोंबडे, 4 मोबाईल फोन, बजाज सिटी 100 मोटारसायकल (MH-29 BJ 4850) तसेच लोखंडी धारदार काती जप्त करण्यात आल्या.
आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(ब) व 12(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यात शेतकऱ्यांचे शेतमाल निघाल्यावर कोंबड बाजार ठिक ठिकाणी उच्छाद मांडतात, कुठे लपूनछपून तर काही ठिकाणी मुकसमतीने सुरू असतो. पोलीस प्रशासन तथा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला (LCB) याबाबत माहिती नसावी हाच संशोधनाचा विषय आहे.
Rokhthok






