Home क्राईम त्या…..दरोड्यातील फरार आरोपी अटकेत

त्या…..दरोड्यातील फरार आरोपी अटकेत

● शहरात ‘ऑल आऊट’ कारवाई, धारदार 6 अवजारे जप्त.....

C1 20260228

शहरात ‘ऑल आऊट’ कारवाई, धारदार 6 अवजारे जप्त…..

Crime News : वणी शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्रे बाळगणाऱ्या इसमास तसेच दरोडा गुन्ह्यातील दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा (LCB), पथकाने अटक करून मोठी कारवाई केली आहे. या दुहेरी कारवाईमुळे गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारात खळबळ उडाली आहे. The absconding accused in the robbery has been arrested.

जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिले होते. त्यानुसार 27 फेब्रुवारीला ‘ऑल आऊट ऑपरेशन’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ पथकाने वणी येथे नाईट पेट्रोलिंग दरम्यान विशेष मोहिम राबविली.

प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे माळीपुरा, वणी येथील निलेश उर्फ अनिकेत कुमेश सोनटक्के (22) याने भविष्यात दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने घरात अवैधरित्या विविध प्रकारची धारदार शस्त्रे साठवून ठेवली असल्याचे समजले. तातडीने त्याच्या घराचीझडती घेतली असता तलवारी, चाकू, कुकरी अशी एकूण 6 धारदार अवजारे, अंदाजे किंमत 14 हजार रुपये, जप्त करण्यात आली.

Img 20250103 Wa0009

या प्रकरणी पोलीस स्टेशन वणी येथे कलम 4/25 आर्म अॅक्ट सहकलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी वणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस स्टेशन वणी येथे दाखल गुन्ह्यांतर्गत कोंडावार यांच्या घरी झालेल्या दरोडा प्रकरणातील फरार आरोपी अनिकेत उर्फ बांडी प्रकाश ऐगडवार (26) रा. यवतमाळ याचा शोध घेऊन त्यास यवतमाळ येथे ताब्यात घेण्यात आले. तो गुन्हा केल्यापासून दोन महिन्यांपासून फरार होता.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, LCB पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली API दत्ता पेंडकर, PSI धनराज हाके, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, निलेश निमकर, सुधिर पिदुरकर, सलमान शेख, रजनिकांत मडावी, सतिश फुके सर्व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
Rokhthok