● युवकांचा भाजपात प्रवेश; संघटनेला बळ
Political News :
गावाच्या विकासासाठी, राष्ट्रनिर्मितीसाठी आणि सबळ नेतृत्वावरील विश्वास व्यक्त करत मोठ्या संख्येने युवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात जाहीर पक्षप्रवेश केला. या प्रवेशामुळे तालुक्यात पक्षसंघटना अधिक बळकट होणार असून आगामी काळात विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे बोलल्या जात आहे. Youth join BJP; Strengthens the organization
तालुक्यातील वरझडी येथे युवकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे परिसरातील वातावरण भारावून गेले. यावेळी पुरुषोत्तम वाडगुरे, मारोती तलांडे, महेश मेश्राम, महेश कुकुडे, विशाल लोनबोले, धनराज शेंडे, अभिषेक मेश्राम, साहिल निकोडे, ओम तलांडे, गणेश धुर्वे, महादेव बोदाडकर, प्रफुल चांदेकर, क्रिष्णा चांदेकर, अर्थव गाऊत्रे आणि आर्यन सावरकर या युवकांनी पक्षात प्रवेश घेऊन राष्ट्रसेवेचा संकल्प केला.
कार्यक्रमाला प्रदेश किसान मोर्चा उपाध्यक्ष दिनकर पावडे, भाजपा जिल्हा सचिव नितीन वासेकर, भाजपा तालुका महामंत्री तुकाराम माथनकर, उपसरपंच धनराज भोयर तसेच वागदरा सर्कल सहप्रमुख दिनेश चांदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी युवकांना मार्गदर्शन करत “सबका साथ, सबका विकास” या ध्येयाने प्रेरित होऊन एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमामुळे तालुक्यातील राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षाचा झंझावात कायम राहणार असल्याचे दिसुन येत आहे. शेवटच्या घटकापर्यंत होत असलेली पक्षबांधणी निर्णायक ठरणार असून स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Rokhthok






