Home क्राईम नववर्षालाच चोरट्यांची पोलिसांना सलामी

नववर्षालाच चोरट्यांची पोलिसांना सलामी

● धाडसी चोरी : लाखोचे दागीने लंपास

614

धाडसी चोरी : लाखोचे दागीने लंपास

Wani News : शहरातील रविनगर परिसरात बंदावस्थेतील घराला चोरट्यानी लक्ष केले. घराचा दरवाजा तोडून लाखो रुपयांच्या दागिन्यांवर ताव मारला. ही घटना दिनांक 2 जानेवारीला उघडकीस आली असून नववर्षाच्या सुरवातीलाच चोरट्यानी पोलिसांना सलामी दिली आहे. Thieves broke the door of the house and stole jewelry worth lakhs of rupees.

Img 20250422 wa0027

रविनगर परिसरातील सूर्यकांत मोरे यांचे घरी जितेशकुमार श्रीकृष्णमुरारी पांडे (40) हे भाडेतत्त्वावर राहतात. ते मूळचे बिहार राज्यातील रोह‌तास येथील असून सध्यस्थीतीत मुकुटबन येथील रिलायन्स कंपनीत नोकरीला आहे. ते 18 डिसेंबर ला आपल्या परिवारासह वृंदावन येथे देव दर्शनासाठी गेले होते.

Img 20250103 Wa0009

कुलूपबंद असलेल्या घरावर पाळत ठेवणाऱ्या चोरट्यानी ही बाब हेरली आणि आपले इस्पित साध्य केले. देवदर्शन आटोपून पांडे परिवार येथे परतले असता त्यांना घराच्या दाराचा कडी कोंडा तुटलेला व दार उघडे आढळले. घरात प्रवेश केला असता चारही कपाटे सताड उघडी दिसली. तर घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले.

चोरट्यानी चोरी केल्याचे लक्षात येताच त्यांनी घराची पाहणी केली असता एका लाकडी कपाटातील 10 ग्रॅमचे मंगळसूत्र, एक हिऱ्यांचे नेकलेस, 15 ग्राम सोन्याची चैन, 20 ग्राम मांगटीका, तीन ग्रामची नथ, 9 व 5 ग्रामचे कानातील झुमके दोन जोड, सात तोळ्याचे चांदीचे दागीने व रोकड 15 हजार रुपये एवढा ऐवज चोरीला गेलेला निदर्शनास आला.

जितेशकुमार पांडे यांनी थेट पोलीस ठाणे गाठून ठाणेदार अजित जाधव यांना विस्तृत माहिती कथन केली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भादंवि कलम 380 नुसार गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.
Rokhthok News