Home वणी परिसर कोळसा डेपो हटविण्यासाठी स्माईल फाउंडेशन मैदानात !

कोळसा डेपो हटविण्यासाठी स्माईल फाउंडेशन मैदानात !

● उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन, कायमस्वरूपी स्थलांतराची मागणी

C1 20260929

● उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन, कायमस्वरूपी स्थलांतराची मागणी

Wani News :
Smile Foundation takes to the field to remove coal depot ! शहरातील लालपुलिया परिसरातील कोळसा डेपोच्या प्रश्नावर आता स्माईल फाउंडेशनने आक्रमक भूमिका घेतली आहे. कोळशाची धूळ, अवजड वाहनांची सततची ये-जा आणि वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा फटका स्थानिक नागरिकांना बसत असल्याचा आरोप करत डेपो कायमस्वरूपी स्थलांतरित करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

IMG 20261110 WA0010
IMG 20261110 WA0007

लालपुलिया परिसरात कोळसा वाहतुकीमुळे धूळ आणि धुराचे प्रदूषण वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. खोकला, दमा आणि श्वसनविकारांसह विविध आरोग्यविषयक समस्यांबाबत नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत. लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

C1 20261112
Screenshot 2026 11 08 16 12 26 03 439a3fec0400f8974d35eed09a31f914
IMG 20261105 WA0005(1)
IMG 20261102 WA0001

कोळसा डेपोमुळे काही घटकांना आर्थिक फायदा होत असेल, तर त्याची किंमत सर्वसामान्य नागरिकांनी का मोजावी? असा थेट सवाल स्माईल फाउंडेशनने उपस्थित केला आहे. कोळसा वाहतूक करणाऱ्या जड वाहनांमुळे परिसरात वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याच्या तक्रारी असून, स्थानिक नागरिकांसह वणी शहर आणि परिसरातील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

IMG 20261109 WA0269(1)
Img 20250103 Wa0009

पाण्याची फवारणी, रस्त्यांची साफसफाई किंवा वाहतुकीचे नियमन हे तात्पुरते उपाय ठरू शकतात, मात्र समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लालपुलिया येथील कोळसा डेपो लोकवस्तीपासून दूर योग्य ठिकाणी स्थलांतरित करणे आवश्यक आहे, अशी भूमिका फाउंडेशनने मांडली.

प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन स्थलांतरासाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करावी आणि आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी डॉ. विश्वास सुंदरानी, स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव आणि सचिव आदर्श दाढे उपस्थित होते.
ROKHTHOK

Previous articleआशिष रिंगोले यांची जिल्हाध्यक्षपदी निवड
Next articleआक्रमक विधिज्ञ आणि संयमी राजनेता
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.