Home वणी परिसर आशिष रिंगोले यांची जिल्हाध्यक्षपदी निवड

आशिष रिंगोले यांची जिल्हाध्यक्षपदी निवड

● स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हास्तरावर केलेल्या कार्याची दखल.....

C1 20260928

● स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हास्तरावर केलेल्या कार्याची दखल…..

WANI NEWS :
Ashish Ringole elected as District President मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय असलेले आशिष रिंगोले यांची वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र प्रदेशच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष डॉ. दिलीप चौधरी यांनी नियुक्तीपत्र देऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली.

IMG 20261110 WA0010
IMG 20261110 WA0007

रिंगोले यांनी यापूर्वी विद्यार्थी व युवकांच्या विविध प्रश्नांसाठी काम केले आहे. शैक्षणिक समस्या, स्पर्धा परीक्षा, रोजगार तसेच विद्यार्थीहिताच्या प्रश्नांवर त्यांनी आंदोलने व विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हास्तरावर केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

C1 20261112
Screenshot 2026 11 08 16 12 26 03 439a3fec0400f8974d35eed09a31f914
IMG 20261105 WA0005(1)
IMG 20261102 WA0001

नवीन जबाबदारीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व करिअर विषयक प्रश्नांना प्राधान्य देत विद्यार्थी संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार आशिष रिंगोले यांनी व्यक्त केला असून वणी उपविभागात त्यांच्या कार्याचे उत्तरदायित्व वाढले आहे. ते धडाकेबाज कार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
ROKHTHOK

IMG 20261109 WA0269(1)
Img 20250103 Wa0009