Home Breaking News भीषण….मालवाहु वाहनाला ट्रकची धडक…आणि..

भीषण….मालवाहु वाहनाला ट्रकची धडक…आणि..

● चारगांव शिरपुर मार्गावरील घटना

6251

चारगांव शिरपुर मार्गावरील घटना

Wani News | तालुक्‍यातील चारगांव शिरपुर मार्गावरील दारु दुकानाजवळ मालवाहु वाहन व ट्रकचा भीषण अपघात झाला. यात एक तरुण गंभीर जखमी झाला असुन ही घटना रवीवार दिनांक 24 सप्‍टेंबरला दुपारी 1 वाजताच्‍या दरम्‍यान घडली. There was a terrible accident involving a cargo vehicle and a truck.

विनोद मोहाडे असे अपघातात जखमी झालेल्‍या तरुणांचे नांव आहे. तो मंदर येथील निवासी असुन आपल्‍या मालवाहु वाहन क्रमांक MH-29-BD-2263 या अँपे मधून घरगुती साहित्‍य गावोगावी जावून विक्री करण्‍याचा व्‍यवसाय करतो. घटनेच्‍या दिवशी तो सकाळीच व्‍यवसायाकरीता गेला होता. परत येत असतांना त्‍याच्‍या वाहनाला शिरपुर कडे जात असलेल्‍या भरधाव ट्रक क्रमांक RJ- 23- TR- 3898 ने जबर धडक दिली.

अपघात प्रचंड भीषण होता, मालवाहू वाहनाचा चेंदामेंदा झाला आणि वाहनातील साहित्य अस्तव्यस्त फेकल्यागेले. या घटनेत मालवाहू वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. प्रत्यक्षदर्शींनी घटनेची सूचना पोलिसांना दिली.
Rokhthok News