Home वणी परिसर वणीत जनगणना ‘बहिष्कार’परिषद

वणीत जनगणना ‘बहिष्कार’परिषद

ओबीसी कृती समितीचा निर्णय

वणी:- जनगणनेत ओबीसी ची स्वतंत्र कॉलम मध्ये जनगणना करण्याची मागणी जोर धरत आहे. केंद्र सरकारने ओबीसीची स्वतंत्र जनगणना करण्यास नकार देऊन सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल्याने ओबीसी कृती समिती निषेध व्यक्त करून जनगणना ‘बहिष्कार’परिषद घेण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे.

येथील धनोजे कुणबी समाज सांस्कृतिक भवनात दि 25 सप्टेंबरला समाजबांधवांची सभा घेण्यात आली. जातनिहाय जनगणना कृती समितीचे अध्यक्ष प्रदीप बोनगीरवार अध्यक्षस्थानी होते. कृती समितीचे निमंत्रक मोहन हरडे यांनी ओबीसी जातनिहाय जनगणना संदर्भात भूमिका सर्वांसमोर मांडली.

C1 20260430

या सभेत राष्ट्रीय जनगणना – २०२१ मध्ये ओबीसी ची स्वतंत्र कॉलम मध्ये जनगणना करण्यास स्पष्ट नकार देऊन सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या  केंद्र सरकारचा निषेध  करण्यात येऊन वणीमध्ये ‘जनगणना बहिष्कार परिषद’ घेण्याचा निर्णय घेण्यात आला.  प्रा. बाळकृष्ण राजूरकर, प्रा. दिलीप मालेकर,  प्रा. अनिल टोंगे, संजयकुमार पेचे, प्रा.डॉ.राम मुडे, हेमराज कळंबे, मंगेश गवळी, प्रवीण खानझोडे, मंगेश गवळी, दिलीप पडोळे, गोविंद थेरे, प्रा. विजय बोबडे, प्रदीप मत्ते, अशोक अंकतवार यांनी जनगणना बहिष्कार परिषद घेण्यासंदर्भात आपले मत व्यक्त केले.

Img 20250103 Wa0009

यावेळी कृती समितीचे मार्गदर्शक नारायण मांडवकर, पांडुरंग पंडिले, विलास शेरकी, सुरेश मांडवकर तसेच कृती समितीचे समन्वयक रघुनाथ कांडरकर, काशीनाथ पचकटे, अशोक चौधरी, गजानन चंदावार, हेमंत गौरकार, रामराव गोहोकार, आशिष साबरे, संदीप मुत्यलवार, सविता रासेकर, सुरेश राजूरकर, नीलकंठ धांडे, विनोद राजूरकर, शेख रहीम, संजय गायकवाड, शंकर शेंडे, प्रमोद लोणारे, सागर जाधव, रविंद्र ताटकोंडावार, गजानन मत्ते, शैलेश राऊत, राकेश बरशेट्टीवार, प्रवीण येलपूलवार, सुधीर खंडाळकर, राजेंद्र देवडे, गजानन तुराळे, बंडू येसेकर, कवडू नागपुरे आदी उपस्थित होते.