Home Breaking News अपघातात एकाचा घटनास्थळीच मृत्यू

अपघातात एकाचा घटनास्थळीच मृत्यू

● उकणी कोळसा खान परिसरातील घटना

C1 20260330
IMG 20260522 WA0013

उकणी कोळसा खान परिसरातील घटना

Sad News : wcl सोबत संलग्न असलेल्या “नारायणी सन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड” या कंपनीचा व्होल्वो ट्रक पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही भीषण घटना सोमवारी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान घडली. Horrific: One person died on the spot in the accident

वीरभान यादव (32) असे मृतक चालकाचे नाव आहे. तो मध्यप्रदेश मधील सिद्धी जिल्ह्यातील निवासी असून येथील माती कंपनी मध्ये ट्रक चालक म्हणून कर्तव्यावर होता. घटनेच्या वेळी कंपनीचा व्होल्वो ट्रक डम्पिंग यार्डमध्ये मुरूम माती खाली करून परत होता. अचानक नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. या अपघातात चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

IMG 20260511 WA0005

घटना घडताच संतप्त चालकांनी एकत्र येत मृताच्या कुटुंबीयांना कंपनीकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी लावून धरली आहे. दरम्यान, या घटनेमुळे कोळसाखाण परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून संबंधित कंपनीवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ROKHTHOK

Img 20250103 Wa0009