Home Breaking News WPL : विजेत्या संघाला चार लाखाचे बक्षीस

WPL : विजेत्या संघाला चार लाखाचे बक्षीस

● मनसे चषक, आजपासून क्रिकेट स्पर्धेची रंगत

C1 20260410
मनसे चषक, आजपासून क्रिकेट स्पर्धेची रंगत

ROKHTHOK : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 10 एप्रिलला येथील शासकीय मैदानावर सायंकाळी 5 वाजता भव्यदिव्य उद्घाटन होणार असून क्रीडाप्रेमींचा उत्साह शिगेला पोहचला आहे. एकापेक्षा एक बलाढ्य टीम मैदानात उतरणार असून विजेत्या संघाला दणदणीत 4 लाखाचे बक्षीस मिळणार आहे. WPL: Winning team to receive Rs 4 lakh prize

WPL मनसे चषक सामन्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचं आयोजकांनी स्पष्ट केले आहे. आकर्षक बक्षिसांची लयलूट होणार असल्याने जिल्हाभरातील संघांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

स्पर्धेचे उद्घाटन आमदार संजय देरकर यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनसेचे पक्षनेते राजू उंबरकर हे असतील तर प्रमुख उपस्थिती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांची असणार आहे. WPL मनसे चषक सामन्यामुळे आज पासून मैदानावर जल्लोष, उत्साह आणि दर्जेदार खेळाचा थरार अनुभवता येणार आहे.

Img 20250103 Wa0009

आयोजित स्पर्धेमुळे वणी शहरात क्रीडा उत्सवाचे वातावरण निर्माण होणार असून, युवकांमध्ये खेळाबद्दलची आवड वाढण्यास मोठी चालना मिळणार आहे. आयोजकांनी सर्व क्रीडाप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले आहे.
Wani News