Home Breaking News भाजपला जबर धक्का! उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश

भाजपला जबर धक्का! उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश

● भाजपचे माजी पदाधिकारी, सरपंच, नेते शिवसेनेत, राजकीय समीकरणात उलथापालथ

C1 20250802 18203741

भाजपचे माजी पदाधिकारी, सरपंच, नेते शिवसेनेत, राजकीय समीकरणात उलथापालथ

Political News :
वणी विधानसभा मतदारसंघातील राजकारणात मोठा भूकंप घडवत भाजपला जबर धक्का बसला आहे. भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांचे अनेक माजी पदाधिकारी, सरपंच, सामाजिक कार्यकर्ते व युवा नेत्यांनी आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. पक्षप्रवेश सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. A huge blow to BJP! A grand party entry in the presence of Uddhav Thackeray

C1 20250802 18232761

भव्य पक्षप्रवेश सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी खासदार अरविंद सावंत, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार संजय देरकर, राजेंद्र गायकवाड, प्रवीण शिंदे, संजय निखाडे, किशोर इंगळे, शरद ठाकरे, सुनील कातकडे, सुधीर थेरे, तर उमरखेड येथील पदाधिकारी सतीश नाईक, नीलेश जैन, राजेश कवाने, राहुल सोनुने, बालाजी मिलमिले यांची उपस्थिती होती.

IMG 20260511 WA0005

अत्यंत दुर्दैवी ! अपघातात एक ठार, दोघे गंभीर

शिवसेनेत प्रवेश केलेले वणी मतदारसंघातील प्रमुख नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य (भाजप) बंडू चांदेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य (भाजप) संघदीप भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य (अपक्ष) दिलीप काकडे, सरपंच अनिल देऊळकर, सरपंच बबन वाटेकर, काँग्रेसचे ज्ञानेश्वर टांगे, मंगेश काकडे, सरपंच विजय ठावरी, उपसरपंच प्रेमा धानोरकर, मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवींद्र पोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहम्मद अशरफ, मोहम्मद असलम, सामाजिक कार्यकर्ते रोशन साव, फैजल शेख यांचा समावेश आहे.

Img 20250103 Wa0009

या घडामोडींमुळे भाजपच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात शिवसेनेने प्रभावी शिरकाव केला असून, भाजपमधील अंतर्गत गटबाजी कार्यकर्त्यांबाबतचा उदासीन दृष्टिकोन यामुळे असंतोष तर वाढला नाही ना, अशी शंका उपस्थित केल्या जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून अनेक दिग्गज कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत भाजपला धक्का दिला आहे.

ही केवळ सुरुवात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ही सामान्य जनतेच्या हक्कासाठी लढणारी संघटना आहे. वणी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा झेंडा अधिक भक्कमपणे फडफडेल. जनतेच्या प्रश्नांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचं शिवसेनेत मनापासून स्वागत असल्याचे याप्रसंगी स्पष्ट करण्यात आले.
संजय देरकर
आमदार, वणी विधानसभा
ROKHTHOK