● Sanjay Rathod यांची मोठी खेळी, शिवसेना (उबाठा) पक्षाला हादरा
Political News :
जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ घडली असून ठाकरे गटातील काही वजनदार पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात अनेकांनी ‘मशाल’ बाजूला सारत ‘धनुष्यबाण’ हाती घेतला. Bitter Shiv Sainiks put aside the ‘torch’ and took up the ‘bow and arrow’
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वावर व विचारांवर विश्वास व्यक्त करत शुक्रवारी वणी येथील शिवसेना (उबाठा) पक्षाचे कडवट शिवसैनिक म्हणून ओळख असलेले दीपक कोकास, माजी नगरसेवक राजू तुराणकर व अजिंक्य शेंडे या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत अधिकृत प्रवेश घेतला. या घडामोडीमुळे शिवसेना (शिंदे गटाला) मोठी बळकटी मिळाल्याचे मानले जात आहे.

पालकमंत्री राठोड यांनी वणी, पांढरकवडा, झरी जामनी, राळेगाव व घाटंजी या तालुक्यांवर विशेष फोकस ठेवत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन विस्ताराची मोहीम हाती घेतली आहे. अन्य राजकीय पक्षतील गावपातळीवरील प्रभावी पदाधिकारी व माजी पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात आणण्याची रणनीती राबवली जात असून त्याला यश येताना दिसत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या की पक्षांतरांचे सत्र सुरू होते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सत्तेचा मोह गावपुढाऱ्यांना आवरता येत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दीपक कोकास, राजू तुराणकर व अजिंक्य शेंडे यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला स्थानिक पातळीवर धक्का बसल्याचे मानले जात आहे,
दरम्यान, पालकमंत्री राठोड यांनी “जिल्ह्यात विकासाचा वेग वाढवण्यासाठी व बाळासाहेबांच्या विचारांना न्याय देण्यासाठी संघटन बळकट करण्याची रणनीती आखली आहे. पुढील काळात आणखी मोठे प्रवेश होण्याचे संकेत आहेत. जिल्ह्यातील राजकारणात या घडामोडीमुळे शिवसेना (शिंदे गट) बळकट होणार असून नवे समीकरण तयार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
Rokhthok






