Home Breaking News गिट्टी क्रशर बनताहेत मृत्यूचा “सापळा”

गिट्टी क्रशर बनताहेत मृत्यूचा “सापळा”

● कामगारांचा मृत्यू आणि मोबदल्याचा खेळ ● मोहदा दुर्घटना बनली न्यायव्यवस्थेची कसोटी

C1 20260207

कामगारांचा मृत्यू आणि मोबदल्याचा खेळ
मोहदा दुर्घटना बनली न्यायव्यवस्थेची कसोटी

Big News :
मोहदा येथील के.बी. खान गिट्टी क्रेशरमध्ये काम करणाऱ्या 54 वर्षीय कामगार प्रकाश सूर्यभान बांदुरकार यांचा कन्वेयर बेल्टमध्ये अडकून झालेला दुर्दैवी मृत्यू म्हणजे केवळ अपघात नसून, तो व्यवस्थेच्या निष्काळजीपणाचा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचा परिणाम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. येथील गिट्टी क्रशर चक्क मृत्यूचा “सापळा” बनताहेत. crusher is becoming a death “trap”

या दुर्घटनेनंतर मृतकाच्या कुटुंबियांना 7 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, “एखाद्या कुटुंबाचा आधार हिरावून घेतल्यानंतर ही रक्कम पुरेशी आहे का?” असा थेट सवाल नातेवाइकांनी उपस्थित केला आहे. हे मोबदला नसून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

IMG 20260511 WA0005

क्रेशरमध्ये सुरक्षेची कोणतीही ठोस व्यवस्था नसल्यामुळे हा अपघात घडल्याचे स्पष्ट होत आहे. मशीनवर सुरक्षा कवच नाही, कामगारांना आवश्यक प्रशिक्षण दिले जात नाही, तसेच सुरक्षा विषयक हेल्मेट, हातमोजे यांसारखी साधनेही पुरवली जात नाहीत. यामुळेच प्रकाश बांदुरकार यांचा जीव गेला, अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरात उमटत आहे.

Img 20250103 Wa0009

स्थानिक नागरिकांच्या मते, वणी परिसरातील बहुतांश गिट्टी क्रेशरमध्ये सुरक्षा नियम केवळ कागदावरच आहेत. उघडे कन्वेयर बेल्ट, संरक्षणाविना चालणाऱ्या मशिनरी आणि असुरक्षित काम करणारे कामगार हे दृश्य नेहमीचेच झाले आहे. प्रशासन केवळ अपघातानंतरच हालचाल करते आणि काही दिवसांत पुन्हा सर्व काही सुरळीत सुरू होते.

प्रकाश बांदुरकार हे कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य होते. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली असून, व्यवस्थेची असंवेदनशीलता पुन्हा एकदा उघड झाली आहे. मृतकाचे नातेवाईक आता केवळ नुकसान भरपाईवर समाधानी नसून, दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई ची मागणी करताना दिसत आहेत.

मागील सात वर्षांत खाणी व क्रेशरमध्ये दबून 9 ते 10 मजुरांचा मृत्यू झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. प्रत्येक वेळी आर्थिक मोबदला देऊन प्रकरण मिटवण्यात आले असून, आजपर्यंत एकाही क्रेशर मालकावर ठोस कारवाई झालेली नाही. प्रकाश बांदुरकार यांच्या मृत्यूनंतर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. ठाणेदार संतोष मनवर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलिस काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
ROKHTHOK