Home Breaking News दुःखद : शिवसेना जिल्हाप्रमुख आशिष खुलसंगे यांना पितृशोक

दुःखद : शिवसेना जिल्हाप्रमुख आशिष खुलसंगे यांना पितृशोक

● माजी अतिरिक्त संचालक आनंदराव मारोती खुलसंगे यांचे निधन

C1 20260803

● माजी अतिरिक्त संचालक आनंदराव मारोती खुलसंगे यांचे निधन

ROKHTHOK: शिवसेना (शिंदे गट) चे नवनियुक्त जिल्हाप्रमुख आशिष खुलसंगे यांचे वडील तथा राज्य शासनातील माजी अतिरिक्त संचालक (Additional Director) आनंदराव मारोती खुलसंगे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने प्रशासकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. Former Additional Director Anandrao Maroti Khulsange passes away

यवतमाळ जिल्ह्यातील झरी-जामणी तालुक्यातील आदिवासी बहुल परिसरातून पुढे आलेल्या आनंदराव खुलसंगे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षण पूर्ण केले. अडेगाव, मुकूटबन आणि यवतमाळ येथे त्यांनी शिक्षण घेतले. लहानपणापासून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी कठोर परिश्रम केले आणि आपल्या कर्तृत्वाच्या बळावर शासन सेवेत उल्लेखनीय वाटचाल केली.

जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून कार्य करताना त्यांनी विविध विकासकामांमध्ये मोलाचे योगदान दिले. त्यानंतर मंत्रालयात अतिरिक्त संचालक (Additional Director) या महत्त्वाच्या पदापर्यंत मजल मारत त्यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेची छाप उमटविली. त्यांच्या कार्यकाळात प्रशासनातील शिस्त, प्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख दृष्टिकोन यासाठी त्यांची ओळख निर्माण झाली होती.

Img 20250103 Wa0009

त्यांच्या पश्चात पुत्र आशिष खुलसंगे, कुटुंबीय व आप्तपरिवार असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच विविध राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. आनंदराव मारोती खुलसंगे यांच्यावर मंगळवारी दुपारी 1 वाजता नागपूर येथील सोनेगाव मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.