Home क्राईम Crime, 25 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

Crime, 25 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

● आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची युद्धपातळीवरील मोहीम..!

C1 20260804

● आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची युद्धपातळीवरील मोहीम..!

ROKHTHOK : यवतमाळ शहरातील अशोकनगर-फुकटनगर परिसर मंगळवारी रात्री रक्तरंजित घटनेने हादरून गेला. अवघ्या 25 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी युद्धपातळीवर मोहीम सुरू केली आहे. Crime, brutal murder of a 25-year-old youth

मृतकाची ओळख इन्नू उर्फ यनायत अली इरफान अली (25) हाअशोकनगर- फुकटनगर, यवतमाळ येथे वास्तव्यास होता,  प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने इन्नू यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक वार केले. हल्ला इतका भीषण होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच यवतमाळ शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार निलेश सुरडकर यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथक, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करत घटनास्थळाचा पंचनामा केला व महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेतले.

Img 20250103 Wa0009

हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वैयक्तिक वाद, जुन्या शत्रुत्वासह इतर विविध शक्यतांवर पोलिसांकडून तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात येत असून प्रत्यक्षदर्शींची चौकशी आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या खळबळजनक हत्याकांडामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करून गुन्ह्याचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. यवतमाळ शहर पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी कसून तपास करत आहेत.