● एकुलत्या एक मुलाने आत्मघात केल्याने परिवार हादरला…..
Sad News :
मारेगाव तालुक्यातील पिसगाव येथे शुक्रवारी सायंकाळी एक अत्यंत दुःखद व धक्कादायक घटना उघडकीस आली. अवघ्या सतरा वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कुंदन बबन आत्राम (17) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. Heartbreaking incident: College youth commits suicide
पिसगाव येथील आत्राम कुटुंब रोजमजुरीवर आपला उदरनिर्वाह करत होते. कुटुंबाचा एकुलता एक आधार असलेला कुंदन मारेगाव येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होता. अभ्यासू आणि शांत स्वभावाचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंदनच्या अशा अचानक जाण्याने गावकरी हादरले आहेत.
शुक्रवारी सायंकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास कुंदनचे आई-वडील शेतातून घरी परतले असता घरात घडलेली ही दुर्दैवी घटना त्यांच्या निदर्शनास आली. क्षणातच आनंदाचे घर दुःखाच्या गर्तेत सापडले आणि कुटुंबाचा आक्रोश परिसरात ऐकू येऊ लागला.कुंदनने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Rokhthok






