Home Breaking News एकदाचं ठरलं, हे असतील स्वीकृत सदस्य

एकदाचं ठरलं, हे असतील स्वीकृत सदस्य

●शिवसेना (उबाठा)च्या शत्रुघ्न मालेकार यांचा मार्ग मोकळा ● नामनिर्देशित सदस्यांची छाननी पूर्ण

C1 20260111

शिवसेना (उबाठा)च्या शत्रुघ्न मालेकार यांचा मार्ग मोकळा
नामनिर्देशित सदस्यांची छाननी पूर्ण

Wani Political News :
वणी नगरपरिषदेत स्वीकृत सदस्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या चार तर शिवसेना (उबाठा) कडून एका उमेदवारांने अर्ज दाखल केला होता. प्राप्त झालेल्या नामनिर्देशित सदस्यांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून ही कार्यवाही उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, यवतमाळ यांच्या वतीने पार पडली. तुलनात्मक संख्याबळाचा आधार घेत पात्र व अपात्र अर्ज निश्चित करण्यात आले. यामध्ये भाजपच्या एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला तर तिघे रिंगणात आहेत. यात कोणाची वर्णी लागणार हे सोमवारी स्पष्ट होणार आहे. Once decided, these will be the nominated members.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडून सादर करण्यात आलेला शत्रुघ्न मारोती मालेकार यांचा अर्ज पात्र ठरविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या नामनिर्देशनाचा मार्ग मोकळा झाला असून नगरपरिषदेत प्रवेश निश्चित झाला आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून सादर करण्यात आलेल्या चार अर्जांपैकी किशनलाल खुंगर, रविंद्र बेलुरकर व अनिल आक्केवार हे तीन अर्ज पात्र ठरले असून अंकुश बोढे यांचा अर्ज अपात्र घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपकडून पात्र ठरलेल्या तिघांपैकी कोणाला संधी मिळणार, याचा निर्णय सोमवारी स्पष्ट होणार आहे.

Img 20250103 Wa0009

नामनिर्देशित सदस्यांच्या पात्रता तपासणीचा सविस्तर अहवाल नगरपरिषदेतील पुढील कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोमवारी होत असलेल्या बैठकीत स्वीकृत सदस्यांबाबतचा निर्णय भाजपचा गटनेता राकेश बुग्गेवार घेणार असून पक्षश्रेष्ठींनी दिलेला आदेश अंतिम असणार आहे. यामुळे सदनात नामनिर्देशित सदस्य म्हणून खुंगर व बेलूरकर हेच असतील असे बोलल्या जात आहे.
Rokhthok