● सभापती पदासाठी एसटी महिला आरक्षण
Political News :
वणी पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी अनुसूचित जमाती महिला आरक्षण निश्चित झाले. सभापती पदाचे आरक्षण जाहीर होताच तालुक्यातील गावपुढाऱ्यांच्या स्वप्नांना तडा गेला आहे. त्यातच सभापतीपदाचे स्वप्न रंगवणाऱ्या अनेकांच्या स्वप्नांवर विरजण पडले आहे. मात्र या आरक्षणामुळे राजकीयदृष्ट्या सामाजिक दृढता प्रबळ होणार आहे. Reservation for the post of Speaker shatters the dreams of village leaders
गट- गण निहाय आरक्षण अवघ्या काही दिवसातच जाहीर होणार आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने राजकीय पक्ष पुढील रणनीती आखणार आहे. सभापती पदाचे आरक्षण आज जाहीर झाले आहे. अनुसूचित जमाती महिला वणी पंचायत समितीच्या सभापती असणार आहे. गण निहाय आरक्षण जाहीर झाल्यावरच उमेदवाराचा शोध, दस्तऐवजाची पूर्तता राजकीय पक्षाला करावी लागणार आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि मनसे या सर्व पक्षांना नव्या समीकरणांची मांडणी करावी लागणार आहे. तालुक्यात मागील दशकभरात भाजपने पंचायत समितीवर आपले वर्चस्व राखले आहे. तरी अनुसूचित जमाती महिला आरक्षणामुळे भाजपला योग्य उमेदवार शोधावा लागणार आहे.
Rokhthok






