● खंडणी गावात पसरली शोककळा
Sad News :
मारेगाव तालुक्यातील खंडणी येथे शनिवार दिनांक 11 ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजता दुःखद घटना घडली. आजीसोबत पीठ गिरणीवर गेलेल्या अडीच वर्षीय चिमुरडीला विषारी सापाने दंश केल्याने मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने खंडणी गावात शोककळा पसरली आहे. A two-and-a-half-year-old girl who had gone to a flour mill with her grandmother died after being bitten by a poisonous snake.
स्नेहा दशरथ मडावी असे मृतक बलिकेचे नाव आहे. स्नेहा दिवसभर आजीसोबत घराजवळच खेळत होती. सायंकाळी आजी पीठ गिरणीवर जाण्यास निघाल्यानंतर नातीनेही सोबत जाण्याचा हट्ट धरला. गिरणीवर पोहोचल्यावर आजी दळण दळत असताना स्नेहा गिरणी परिसरात खेळत होती. त्या वेळी तिला सापाने चावा घेतला.

स्नेहाला तत्काळ मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या घटनेने खंडणी गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Rokhthok






